Farmer organisations protest in Parbhani after a farmer allegedly died by suicide over denied subsidy due to eKYC failure. saam tv
महाराष्ट्र

eKycन केल्यानं अनुदान गेलं; शंभर रुपयांपायी शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं, परभणीतील धक्कादायक घटना

Farmer Killed Himself: परभणीतील सोनपेठ येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकसान झालं होतं. त्या नुकसान भरपाईसाठी अनुदान देण्यात येत होतं. परंतु अनुदान मिळाल्यानं शेतकऱ्यानं आत्महत्या केली.

Bharat Jadhav

  • परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात धक्कादायक घटना

  • ई-केवायसी न केल्यामुळे अतिवृष्टी अनुदान मिळालं नाही, आरोप

  • अल्पभूधारक व कर्जबाजारी शेतकरी धनंजय बोचरे यांची आत्महत्या

विशाल शिंदे, साम प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील सोनपेठच्या कोठाळा येतील शेतकरी अतीवृष्टीचे अनुदान न मिळाल्याने धनंजय बोचरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप भारत राष्ट्र किसान समिती व शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. कोठाळा येथील अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकरी धनंजय बोचरे यांनी दि ८ जानेवारी रोजी आपल्या शेतातील जांभळीच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली होती.

यासंदर्भात भारत राष्ट्र किसान समितीचे समन्वयक सुधीर बिंदू व शेतकरी संघटनेचे विश्वंभर गोरवे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना सात्वंना दिली. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी काळे कपडे घालून सोनपेठ तहसीलदार यांना निवेदन देऊन धनंजय बोचरे यांना ईकेवायसी केली नसल्याने अनुदान जमा न झाल्याने त्यांना पैसे मिळाले नाही व त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

धनंजय बोचरे यांच्या शेतात नाल्याचे पाणी शिरुन पिके अतिवृष्टीमुळे पुर्णपणे नष्ट झाली होती . त्यामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी व घर संसार चालवण्यासाठी ते ऊस तोडीसाठी गेले होते. त्यांना अतिवृष्टीचे अनुदान जमा झाल्याचे कळाल्याने ते कामावरुन सोनपेठला आले होते, त्यांच्याकडे अत्यंत मोजके पैसे होते. ईकेवायसी झाली नसल्याने खात्यावर पैसै जमा न झाल्याचे धनंजय बोचरे यांना कळाले. ईकेवायसीयी करण्यासाठी शंभर रुपये लागत असल्याने त्यांनी अनेकांकडे पैशांची मागणी केली पण कोणीही त्यांना पैसै दिले नाही.

त्यांनी आपल्या जवळील चाळीस रुपयांपैकी भूक लागल्याने वीस रुपयांचा वडा पाव खाल्ला व पंधरा रुपयांची दोरी घेतली व सोनपेठहून १५ किलोमीटर दूर असलेल्या शेतात पायी जाऊन जांभळीच्या झाडाला फाशी घेतली. पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा त्यांच्या खिशात पाच रुपये व आधार कार्ड सापडले .

अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्यानेच त्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप भारत राष्ट्र किसान समिती व शेतकरी संघटनेने केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काळे कपडे घालुन या घटनेचा निषेध करण्यात आला .नायब तहसीलदार देवेंद्रसिंह चंदेल यांना दिलेल्या निवेदनात तातडीने शेतकऱ्यांची सर्व अनुदाने शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: बर्फाळ वादळात विमानाचा भीषण अपघात; टेकऑफ करतानाच कोसळलं विमान, ७ जणांचा मृत्यू

विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना मुंबईच्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

सरकार देणार गरिबांना 2 हजार? गरिबांसाठी केंद्र सरकारची नवी योजना?

लाडक्या बहिणींना शब्द, 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगितलं

मुंबईत शिंदेसेनेची स्वतंत्र गटनोंदणी? शिंदेंना भाजपसोबत संयुक्त गटनोंदणी का नको?

SCROLL FOR NEXT