Godavari River Saam tv
महाराष्ट्र

Godavari River : गोदावरीवरील तिन्ही बंधारे कोरडे; गोदाकाठावरील नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती 

Parbhani News : गोदावरी नदीवर असलेले तीन उच्च पातळी बंधारे गेल्या दोन महिन्या पासून कोरडे पडले असून पाणी पिण्याचा प्रश्न बिकट झाला आहे

राजेश काटकर

परभणी : देशात प्रमुख नद्या पैकी एक असलेली गोदावरी नदी यंदा कोरडीठाक पडली आहे. यामुळे गोदाकाठच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी गोदावरी नदीवर असलेले तीन उच्च पातळी बंधारे गेल्या दोन महिन्या पासून कोरडे पडले असून पाणी पिण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. 

अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणात सद्य:स्थितीत केवळ २८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर जिल्हातील दुसरे मोठे धरण दूधना प्रकल्पात केवळ ५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. (Godavari River) गोदावरी वरील सर्व उच्च पातळी बंधाऱ्यात दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करण्यात येते. पण या वर्षी प्रशासनाने जूनमध्ये बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करून पाणी सोडून दिले असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

गतवर्षी पाऊस (Rain) कमी झाल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सर्वच बंधारे. तलावांची ताल गाठला आहे. यात गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचा देखील समावेश येतो. यातच गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू (Water Scarcity) चोवीस तास उपसली जाते. प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध असल्याने गोदावरी पोखरली गेली आहे. पाऊस लवकर आला नाही तर गोदाकाठच्या ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express: गुड न्यूज! ४ नव्या वंदे भारत एक्सप्रेस होणार सुरू, वाचा कुठून कुठे धावणार, काय असेल मार्ग?

अंबानींवरचा फास आवळला, मुंबई ते दिल्ली 7,500 कोटींची संपत्ती जप्त|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तूर्तास स्थगित

Weird dreams during fever: ताप आल्यावर भयानक स्वप्नं का पडतात? जाणून घ्या यामागील सायन्स

Women's World Cup 2025: भारताच्या लेकी वर्ल्ड चॅम्पियन्स; हरमनप्रीतच्या टीम इंडियानं रचला इतिहास

SCROLL FOR NEXT