Parbhani Jeep Accident Saam TV
महाराष्ट्र

Parbhani Accident: साईबाबांच्या दर्शनाहून परतताना भाविकांवर काळाची झडप; दोघांचा जागीच मृत्यू तर १२ गंभीर

Priya More

राजेश काटकर, परभणी

परभणीतून भीषण अपघाताची (Parbhani Accident) घटना समोर आली आहे. साईबाबाच्या (Saibaba) दर्शनावरून परतत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. जीपच्या भीषण अपघातामध्ये दोन भाविकांचा जागीच मृत्यू तर १२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महामार्गावर चारठाणा गावाजवळ ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाण्याजवळ भरधाव जीप पलटी होऊन हा अपघात झाला. चारठाणा गावाजवळील एका वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि जीप रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघाताची ही घटना बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. हिंगोली जिल्ह्यातील कनका या गावातील भाविक जीपने शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून आपल्या गावी परत जात असताना भाविकांच्या जीपला अपघात झाला. पहाटे साडेतीनच्या सुमारास चारठाणा गावाजवळील एका वळण चालकाचा जीपवरील ताबा सुटला. ही जीप पलट्या खात रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जावून आदळली.

जीपमधील रुक्मिनी चंदू चाभाडे (35 वर्षे) आणि दिपक सखाराम जाधव (36 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये १२ भाविक जखमी झालेत. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जिंतूर येथे प्राथमिक उपचार करून जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींमधील ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT