हाथरसमधील चेंगराचेंगरीची दुर्घटना ताजी असतानाच जम्मू काश्मिरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरनाथ यात्रेवरून माघारी येणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. भारतीय सैन्याच्या तत्परतेने बसच्या टायर समोर मोठे दगड टाकून बस थांबवण्यात यश आले. यामध्ये बसमधून उड्या मारल्याने १० भाविक जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांसह भारतीय लष्कराच्या जवानांच्या सतर्कतेमुळे ४० प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. अमरनाथ यात्रेवरुन पंजाबमधील होशियारपूरला जाणाऱ्या एका बसचा ब्रेक फेल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या बसमध्ये जवळपास जवळपास ४० भाविक होते.
ब्रेक फेल झाल्याचे समजताच बसमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवासी घाबरुन गेले. अशातच काही जणांनी चालू बसमधून उड्याही मारल्या. बसमधून प्रवाशांना उड्या मारताना पाहून भारतीय सैन्यातील जवानांनी सतर्कता दाखवत बस थांबण्यासाठी प्रयत्न केले. या जवानांनी बसपुढे मोठे मोठे दगड टाकायला सुरूवात केली ज्यामुळे बसचा वेग कमी झाला अन् बस थांबली.
ही प्रवाशांनी भरलेली बस थांबली नसती तर मोठ्या दरीमध्ये कोसळून अनर्थ घडला असता. मात्र भारतीय जवानांच्या धाडसामुळे आणि सतर्कतेमुळे ४० प्रवाशांना वाचवण्यात यश आले. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.