Leopard  Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात १२ शेळ्यांचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना, जुन्नरमध्ये संरक्षणासाठी मेंढपाळांना सोलर लाईटसह टेन्ट

Parbhani News : शेती व शेळी पालनातून ते उदरनिर्वाह करतात. दरम्यान, रात्री नियमितपणे शेळ्या चारून एकाच ठिकाणी शेत आखाड्यावर त्या बांधल्या दरम्यान पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला.

राजेश काटकर, रोहिदास गाडगे

परभणी/ जुन्नर : गाव शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे बिबट्याकडून हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. याच दरम्यान जिंतूर तालुक्यातील इटोली शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात १२ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनक्षेत्र परिसरात बिबट्याच्या संरक्षणासाठी मेंढपाळांनी सोलर लाईटसह टेन्ट देण्यात आले आहेत. 

परभणी जिल्ह्यातील इटोली गावातील राजाराम खुणे, विठ्ठल मोगरे, शिवाजी शेळके या पशुपालकांचा शिवारात शेत आखाडा आहे. शेती व शेळी पालनातून ते उदरनिर्वाह करतात. दरम्यान, रात्री नियमितपणे शेळ्या चारून एकाच ठिकाणी शेत आखाड्यावर त्या बांधल्या होत्या. दरम्यान पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. यात १२ शेळ्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, आज सकाळी पशुपालक शेळ्यांची पाहणी करण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे पशुपालकांमधून भीती व्यक्त होत असून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात येत आहे. 

संरक्षणासाठी मेंढपाळांना सोलर लाईटसह टेन्ट
जुन्नर (पुणे)
: जुन्नर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या मेंढपाळ्यांचे बिबट्याच्या हल्ल्यापासुन संरक्षण व्हावे; यासाठी वनविभागाकडुन सोलर लाईटसह टेन्ट वाटप करण्यात आले आहेत. मेंढपालांचे शेत शिवारात उघड्यावर रोज वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य असल्याने बिबट्याचे हल्ले होऊन अनेकांचे बळी गेले आहे. त्यातुन बिबट माणुस यांच्यातला संघर्ष उभा राहिला असल्याने आता वन विभागाने मेंढपाळांच्या संरक्षणाला मदत व्हावी; यासाठी सुरक्षित टेन्ट देण्यात आले असुन याचा वापर नियमित करावा; असे आवाहनही करण्यात आले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Reelstar Couple: प्रत्येक नवरा-बायकोनं बघावी अशी लव्ह स्टोरी! सोलापूरच्या कपलची संघर्ष कहाणी साऊथमध्ये झळकणार, VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Maharashtra Politics : भाजपमध्ये अल्पसंख्याक सेल का? व्होट जिहादच्या आरोपावर मनसेचा खोचक सवाल

Crime News: पुणे, बीडनंतर आता लातूरमध्ये गुंडाराज;भरचौकात तरुणावर तलवारीनं हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Jio Special Offer: सासू सुनेचा राडा ते सस्पेन्स ड्रामा; १ रुपयात ३० फुलऑन दिवस मनोरंजन

SCROLL FOR NEXT