परभणी : परभणी महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ठाकरेसेनेचे २५ जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. मराठवाड्यातील परभणीत ठाकरेंची मशाल धगधगली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाने बाजी मारल्याने महायुतीचा महापौर होणे जवळपास अशक्य झालं आहे.
परभणी महापालिकेच्या महायुतीच्या भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या बहुतेक उमेदवारांना पराभवाला सामोरे जावं लागले आहे. त्यामुळे मुंबईत टेन्शन वाढलेल्या ठाकरे गटाला परभणीत दिलासा मिळाला आहे. या विजयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय जाधव म्हणाले, 'परभणीच्या मतदारांनी शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी कौल दिलाय. त्यामुळे त्यांचं अभिनंदन'.
संजय जाधव पुढे म्हणाले,'आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की, परभणीमध्ये भाजपला दोन आकडेही घेता येणार नाहीत. मात्र त्यांनी दोन आकडे गाठले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खाते उघडणार नाही. ते उघडलेही नाही. परभणीमध्ये भाजपचा महापौर होणे शक्य नाही. तो होणारही नाही. भाजपचे जे काही उमेदवार निवडून आले आहेत. ते चिल्लरीवर निवडून आले आहेत. परभणीच्या जनतेने शिवसेनेचा पहिला महापौर बसवला आहे. त्यामुळे मी जनतेचे अभिनंदन करतो'.
'जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू आणि जिल्हा परिषदेवर देखील शिवसेनेचा भगवा झेंडा फडकू मुंबईमध्ये अपयश आले आहे. भाजप सर्व पैशांच्या जोरावर काम करत आहे. भाजपाला सत्तेची इतकी हवा लागली आहे की, ते खेड्यापर्यंतच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालत आहेत ,असं वक्तव्य परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.