Parbhani News Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani News: दुःखद! परभणीत पोहोण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Parbhani Jintur News: दुःखद! परभणीत पोहोण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

राजेश काटकर

Parbhani Jintur News:

जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील एका खदानीमध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

सायंकाळी बुडालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. गजानन रामभाऊ वायगुडे (वय वर्ष १५) आणि मंथन गणेश अवतारे (वय वर्ष १५) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कौसडी येथील शाळकरी मित्र गजानन आणि मंथन हे आपल्या मित्रांसोबत आज कौसडी शिवारातील नंबर ७२४ मधील गायरान जमिनीतील खदानीमध्ये पोहायला गेले होते. गजानन वायगुडे आणि मंचन अवतारे या दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. (Latest Marathi News)

बाहेर असलेल्या दोन मित्रांनी त्यानं वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना अपयश आलं. हे दोघे बुडत असताना त्यांच्या मित्राने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. परंतु जवळपास कोणीच नसल्याने ते दोन विद्यार्थी पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना बोरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी दोन्ही मुलाला मृत्य घोषित केलं. घटनेची नोंद बोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India: विराट- रोहितने आता एकच काम करावं..ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने दिला लाखमोलाचा सल्ला

Cyber Crime : ऑनलाइन जॉबची ऑफर देत फसवणूक; तरुणाला पावणेपाच लाखांचा गंडा

Maharashtra News Live Updates: लाडक्या बहिणीच्या विरोधात लढले,काकांचा विश्वासात केला; सुषमा अंधारेंनी अजित पवारांना डिवचलं

Nana Patole : देवेंद्र फडणवीस स्वत: निवडून येणार नाहीत; अमित शहांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

Sambhaji Raje Chhatrapati : 'छत्रपती शिवरायांचे गुरु फक्त...'; अमित शहांच्या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT