Jintur Crime Saam tv
महाराष्ट्र

Jintur Crime : आपसी वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्याकाठ्या अन् लोखंडी रॉडने मारहाण, आठ जण जखमी

Parbhani News : एकाच परिसरात राहणाऱ्या परिवारांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. याचा राग दोघांमध्ये असल्याने काही कारणात्सव हा वाद पुन्हा उफाळून आला. याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

Rajesh Sonwane

विशाल शिंदे 
परभणी
: दोन गटांमध्ये असलेला आपसी वाद उफाळून आल्याने दोन्ही गट आमनेसामने आले. यानंतर एकमेकांना लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यात आठ जण जखमी झाले असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. सदरची घटना जिंतूर शहरात घडली असून जखमींना परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

परभणीच्या जिंतूर शहरातील कुरेशी मोहल्ला येथे घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात दोन गटात वाद होता. या आपसी वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत एकमेकांना लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. एकमेकांवर असलेल्या रागातून हि हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. 

दोन जण गंभीर जखमी 

दोन्ही गट समोरासमोर आल्याने झालेल्या हाणामारीत आठ ते दहाजण जखमी असून दोन जणांना डोक्यात मार असल्याने गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. तर घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गोडाऊनमधुन हरभरा चोरणारा ताब्यात 
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील किणी येतील एका गोडाऊनचे शटर उचकटून हरभऱ्याचे ४३ कट्टे चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेला टेम्पो व हरभरा असा एकुण ६ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गौस वहीद पठान असे आरोपीचे नाव असुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील कारवाईसाठी ढोकी पोलिसात आरोपीला हजर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

Shocking: प्रियकराची सटकली, प्रेयसीच्या तोंडात कोंबली स्फोटकं; स्फोटानंतर चेहरा झाला छिन्नविछन्न

Pune: गणेशोत्सवात पुण्यात ७००० पोलिस तैनात, एआय कॅमेऱ्याची असणार नजर; २७ ऑगस्ट अन् ६ सप्टेंबर 'ड्राय डे' घोषित

Atharva Sudame: पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक अधोगती

SCROLL FOR NEXT