Three Warkaris killed while returning from kirtan Saam
महाराष्ट्र

Parbhani Accident: कीर्तनाहून येताना भयंकर अपघात, ३ वारकर्‍यांचा जागीच मृत्यू, दत्ता महाराज मुडेकरांचं निधन

Parbhani-Jintur Accident : परभणी-जिंतूर मार्गावर कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. कीर्तनाहून घरी परतत असताना झालेल्या या दुर्घटनेमुळे मराठवाड्यातील वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

Namdeo Kumbhar

विशाल शिंदे, परभणी

Three Warkaris killed while returning from kirtan : कीर्तनाहून घराकडे येताना मराठवाड्यातील परभणीत भयंकर अपघात झाला. यामध्ये तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय. दत्ता महाराज मुडेकर , माऊली महाराज कदम , प्रसाद महाराज कदम याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मराठवाड्यातील वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू आहे.

परभणी जिंतूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा आज पहाटे अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 3 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परभणी जिंतूर महामार्गावर असलेल्या झरी गावाजवळ मोटारसायकल आणि कारचा अपघात झाला. दत्ता महाराज, माऊली महाराज आणि प्रसाद महाराज हे क्रीर्तनाहून घराकडे जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. तिन्ही महाराज गावोगावी जाऊन किर्तन अन् प्रवचन देत होते. पण किर्तनाहून घरी येताना काळाने घाला घातला.

मयत वारकऱ्यांची नावे -

हभप. माऊली दिगंबरराव कदम (३०), (रा. बोर्डी ता. जिंतूर),

हभप. प्रसादराव कदम (४५, रा. बोर्डी ता. जिंतूर),

हभप. दत्ता माणिकराव कऱ्हाळे (३०, रा. मुडा, ता. जिंतूर)

हभप. माऊली कदम, हभप. प्रसादराव कदम आणि हभप. दत्ता कराळे हे तिघे परभणीतील पिंपळामधील कीर्तनसाठी गेले होते. गावातील कीर्तन आटोपल्यानंतर आपल्या घराकडे निघाले होते. मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास तिघेही दुचाकीने परभणी- जिंतूर मार्गाने बोर्डी गावाकडे निघाले होते. झरी गावाजवळच्या लोअर दुधना डाव्या कालव्याच्या जवळ येतात काळाने घाला घातला. महाराजांच्या दुचाकीला कारने जोरात धडक दिली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले.

मध्यरात्री अपघाताची माहिती मिळतच पोलिसांनी झरी गावात धाव घेतली. शंकर हाके यांनी तात्काळ या अपघातात तिघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल केले. पण उपचारावेळी तिघांचा मृत्यू झाला. अपघातात वारकऱ्यांचे निधन झाल्याची माहिती कळताच बोर्डी गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

Maharashtra Live News Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ला, राजकीय षडयंत्र

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

SCROLL FOR NEXT