Crime News saam tv
महाराष्ट्र

Parbhani Crime News : सख्खे शेजारी, पक्के वैरी! बदला घेण्याच्या उद्देशाने चक्क ३ वर्षाच्या चिमुकल्याला संपवलं

घरातील फरशीखाली पुरून ठेवला तीन वर्षीय मुलाचा मृत्यूदेह

राजेश काटकर

Parbhani Latest Crime News : परभणीच्या ताडकळस गावातून एकदा धक्कादायक बातमी समोर येत आहे. बदला घेण्याचे उद्देशाने सासू आणि सुनेनं तीन वर्षे बालकाचा अपहरण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आरोपीनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तीन वर्षीय मुलाचा मृत्यूदेह घरातील फरशीखाली पुरून ठेवला होता. पूर्ववैमनस्यातून या तीन वर्षीय बालकाच हा खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

परभणीच्या (Parbhani) ताडकळस येथील सिद्धेश्वर नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा छडा लावण्यात परभणी पोलिसांनी यश आलं आहे. 13 जानेवारी रोजी बालकाच्या आईने अज्ञाताने आपल्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार ताडकळस पोलिसांत दिली होती. त्यानुसार ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी (Police) तपासाची चक्र फिरवली.

पोलीस तपासात शेजारी राहणाऱ्या सासू-सुनेनं संशय आला. त्यानंतर तपासासाठी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या सासू- सुनेला संबोलावून विचारपूस केली असता त्यांनी बदला घेण्याच्या उद्देशाने या चमुरड्याचा खून केल्याची कबुली दिली तसेच घरातच त्याला एका कोपऱ्यात फर्शीखाली त्याचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली.

दरम्यान या प्रकरणात सासू-सून या दोघींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन ताडकळस पोलीसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामोड हे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT