Parbhani News Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News: मित्रांसोबत पोहायला गेले अन् होत्याचं नव्हतं झालं; २ शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू

Parbhani Accident: पुंगळा गावापासून उत्तर दिशेला पुंगळा तांडा असून तांड्याच्या बाजूलाच एक छोटासा लघू सिंचन तलाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

Parbhani:

परभणीमधील जिंतूर तालुक्यातील २ विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झालाय. मोजे पुंगळा तांडा येथील दोन विद्यार्थी पोहण्यासाठी तलावात गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलांचा मृत्यू झालाय. ६ ऑक्टोबर रोजी शुक्रवार सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. यामुळे गावात मोठी शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

पुंगळा गावापासून उत्तर दिशेला पुंगळा तांडा असून तांड्याच्या बाजूलाच एक छोटासा लघू सिंचन तलाव आहे. या तलावावर पोहण्यासाठी चार-पाच विद्यार्थी गेले होते. सायकल, बूट, चप्पल, कपडे काढून दुपारी चारच्या सुमारास पोहोत असताना अचानक दोन विद्यार्थी पाण्यात बुडाले.

बराच वेळ झाला तरी ते वरती आले नाहीत त्यामुळे इतर मुलांनी घरी जाऊन त्यांच्या पालकांना ही माहिती सांगितली. त्यानंतर पालक आणि परिसरातील नागरिकांनी तलावावर मोठी गर्दी केली. व्यवस्थित शोध घेतला असता दोन्ही विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला.

गोविंद संजू राठोड राठोड (वय ९ वर्षे) इयत्ता 3 री मध्ये शिकत होता. युवराज कृष्णा चव्हाण (वय 11 वर्षे) इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता. ही दोन्ही मुलं तलावात मृत अवस्थेत होती. या घटनेमुळे तांडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत .जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी भेट देऊन सदरील विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. पुंगळा गावचे सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT