Liquor Truck Overturned saam tv
महाराष्ट्र

Parbhani Accident News : परभणीत दारूचा ट्रक पलटी, चालक जखमी! मदत सोडून नागरिकांचा बाटल्यांवर डल्ला

साम टिव्ही ब्युरो

Parbhani News : जिंतूर परभणी रस्त्यावरील येसेगाव पाटील जवळ सकाळी तीनच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारा दारूचा ट्रक रस्त्याचा खाली पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी अपघातात जखमीला मदत करण्या ऐवजी नागरिकांनी ट्रकमधील दारुच्या बॉटलवर मारला डल्ला मारल्याचा प्रकार घडला.

जिंतूर परभणी रस्त्यावरील येसेगाव पाटीजवळ नाशिकहून नांदेडकडे दारू घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगाने जिंतूरहून परभणीमार्गे नांदेडकडे जात होता. दरम्यान येसेगाव पाटीजवळ अज्ञात कंटेनरने जोरदार कट मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला ट्रक रस्त्याच्या खाली गेला. चालकाने कसा तरी ट्रकवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु रस्त्याच्या कडेला मुरूम टाकलेल्या जागेवरून ट्रक घसरला आणि बाजूला शेतात जाऊन पलटी झाला.

यावेळी ट्रकमधील दारूच्या बॉटल असलेले बॉक्स बाहेर पडले होते. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत असतानाच त्याला मदत करण्याऐवजी या परिसरातून ये जा करणाऱ्या लोकांनी दारूचे बॉक्स उचलून नेले. जखमी अवस्थेत चालकाने पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. यावेळी घटनास्थळी पोलीस पथकाने धाव घेऊन बॉक्स घेऊन जाणाऱ्या नागरिकांना थांबवले. (Crime News)

दरम्यान ट्रक चालक इरशाद खान फिरोज खान (वय 37 वर्षे रा. वैजापूर) यांना जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात याबाबत नोंद झाली नसून नुकसान किती झाले याबाबतची माहिती पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर समोर येईल. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT