Indian Railway Rules: रेल्वेत चुकूनही करू ना 'हे' काम, नाहीतर तुरुंगात जावं लागेल

Indian Railway News: रेल्वेत चुकूनही करू ना 'हे' काम, नाहीतर तुरुंगात जावं लागेल
Indian Railways
Indian RailwaysSaam Tv
Published On

Indian Railway Rules: तुम्हीही रेल्वेने प्रवास करता? तुमचं उत्तर हो असेल, तर रेल्वेचे हे नियम नक्की जाणून घ्या. जर तुम्हाला हे नियम माहित नसतील तर तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. तुम्हाला माहित आहे का की, रेल्वेच्या कोणत्या डब्यात चुकूनही प्रवास करू नये आणि ट्रेनमध्ये बसून कोणते काम करू नये? आज आम्ही तुम्हाला अशाच नियमांबद्दल सांगत आहोत. ज्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल.

या डब्यातून प्रवास केल्यास तुरुंगवास भोगावा लागणार

रेल्वेमध्येही असाही एक डब्बा असतो, जॅमध्ये जेवण तयार करण्यासाठी पॅन्ट्री कोच असते. ज्याला पॅन्ट्री कार (Pantry Car) देखील म्हणतात. जर एखादी व्यक्ती रेल्वेच्या पँट्री कारमधून प्रवास करताना आढळली तर त्याला तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

Indian Railways
Indian Railways Slowest Train: 'ही' आहे देशातील सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे; 5 तासात फक्त 46 किलोमीटर अंतर कापते

रेल्वेच्या नियमानुसार कोणताही प्रवासी रेल्वेच्या पॅंट्री कारमध्ये प्रवास करू शकत नाही. असे कोणी करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाते. असं असलं तरी तुम्ही कोणत्याही विशेष गरजेसाठी पॅन्ट्री कारमध्ये जाऊ शकता, परंतु त्यामध्ये प्रवास करू शकत नाही. (Latest Marathi News)

या नियमांचे पालन करणे देखील आवश्यक

रेल्वेमध्ये, प्लॅटफॉर्मवर आणि स्टेशनच्या आवारात धुम्रपान करण्यासही सक्त मनाई आहे. यासोबतच रेल्वे आणि रेल्वे परिसरात मद्यपान करण्यासही बंदी आहे. तसेच प्रवाशांना त्यांच्यासोबत सामान नेण्याची परवानगी आहे, परंतु वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावे.

Indian Railways
Simple One Electric Scooter Launched: मुंबई ते पुणे एका चार्जमध्ये गाठणार! नवीन सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सामान घेऊन जाण्यासाठी एसी आणि सेकंड एसीसाठी 40 किलो, थर्ड एसी आणि चेअर कारसाठी 35 किलो आणि स्लीपर क्लाससाठी 15 किलो आहे. तसेच प्रवाशांना धोकादायक वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. कोणतीही धोकादायक वस्तू तुमच्याकडे आढळल्यास तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com