Bribe Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : तलाठ्याशी ओळख असल्याचे सांगत सात हजार घेताच एसीबीने पकडले, नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एसीबीने तक्रारीची पडताळणी करुन सापळा रचत कारवाई केली.

राजेश काटकर

Parbhani News : परभणी शहर महापालिका हद्दीतील खानापूरात खरेदी केलेल्या प्लॉटचा फेरफार तलाठ्या कडून करून घेतो म्हणून तक्रारदाराकडून सात हजारांची लाच घेणाऱ्या हर्षवर्धन सूर्यवंशी यास एसीबीने पकडले. सूर्यवंशी याच्यावर नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

यातील तक्रारदार यांनी परभणी शहर महापालिका हद्दीतील खानापूर सर्व्हेमध्ये खरेदी केलेल्या प्लॉटचा फेरफार करून सातबाराला नोंद घेण्यासाठी सूर्यवंशी (खाजगी इसम) याने तलाठी यांच्याकडून काम करून घेतो असे म्हणून तक्रारदार यांना प्रथम 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांची संबंधितास पैसे द्यायची इच्छा नव्हती. त्याने परभणी एसीबी कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली. दरम्यान तडजाेडी अंती सूर्यवंशी याने सात हजार द्यावेत असे तक्रारदाराशी निश्चित केले. त्याची पडताळणी करुन एसीबीने सापळा रचला.

त्यानंतर एसीबीने बुधवारी हर्षवर्धन सूर्यवंशी यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन नवामोंढा येथे गुन्हा दाखल केला. यामध्ये संशयिताने तक्रारदारास तुमचे फेरफारचे कामासाठी 15 हजार रूपये लागतील असे सांगितले.

त्यावरून तक्रारदार यांनी एवढे पैसे कशासाठी लागतात असे विचारले असता, महानगरपालिका मध्ये तुमचे प्लॉटचे नियमितीकरण झालेले नाही. तलाठी माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्याकडून मी तुमचे सातबाराचे काम करून घेतो असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Enterpreneurs: सर्वात श्रीमंत उद्योदपतींच्या यादीत एलॉन मस्क पहिल्या आणि मुकेश अंबानी 12 व्या क्रमांकावर

Prajaka Mali Tattoo: प्राजक्ता माळीच्या हातावार टॅटू कोणाचा? दडलंय खास व्यक्तीचं नाव

Maharashtra News Live Updates : गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध - नितीश राणे

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

Gold Price Today: सुवर्णसंधी! सलग सहाव्या दिवशी पुन्हा घसरला सोन्याचा भाव; पाहा १० ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार पैसे

SCROLL FOR NEXT