FRP For Sugarcane : प्रशासन, साखर कारखानदारांच्या बैठकीतून बाहेर पडताच राजू शेट्टी सरकारवर बरसले

कर्नाटकचा एफआरपी जो जाहीर केला आहे. त्यात तोडणी वाहतुकीचा समावेश नाही. यावर्षी तुटणाऱ्या उसाला किती मागायचं हे येणाऱ्या ऊस परिषदेत ठरविले जाईल असे राजू शेट्टींनी नमूद केले.
Raju Shetti, CM Eknath Shinde , Devendra Fadnavis, Kolhapur, sugar factories denies to give rs 400 as second instalment for sugarcane frp
Raju Shetti, CM Eknath Shinde , Devendra Fadnavis, Kolhapur, sugar factories denies to give rs 400 as second instalment for sugarcane frp saam tv
Published On

- रणजीत माजगावकर / विजय पाटील

Kolhapur News : ऑडिट झाले नसल्याने साखर कारखानदारांनी ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये देण्यास असर्मथा दाखविल्याने आज (गुरुवार) काेल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या समवेत आयाेजिलेल्या बैठकीत काेणताच मार्ग निघू शकलेला नाही. दरम्यान साम टीव्हीशी बाेलताना शेट्टी यांनी आगामी काळातील आंदाेलन तीव्र करणार असल्याचा इशारा साखर कारखानादार आणि सरकारला दिला आहे.  (Maharashtra News)

Raju Shetti, CM Eknath Shinde , Devendra Fadnavis, Kolhapur, sugar factories denies to give rs 400 as second instalment for sugarcane frp
Tuljabhavani Mandir : शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरु, तुळजापुरात भाविकांसाठी वॉटरप्रूफ दर्शन मंडपाची उभारणी (पाहा व्हिडिओ)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर आज तोडगा काढण्यासाठी काेल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर (rahul rekhawar) यांनी बैठक बोलावली हाेती. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या सोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी देखील चर्चा केली. या बैठकीत साखर कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.

गेल्यावर्षीच्या हंगामातील उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. अनेक कारखान्यांची साखर वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखली आहे. दरम्यान आजच्या बैठकीत ताेडगा निघेल असे वाटत असतानाच साखर कारखानादारांनी ऑडिट झाले नसल्याने ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये देण्यास असर्मथा दर्शवली. त्यानंतर शेट्टी यांनी आगामी आंदाेलन तीव्र करु असा इशारा प्रशासानास दिला.

Raju Shetti, CM Eknath Shinde , Devendra Fadnavis, Kolhapur, sugar factories denies to give rs 400 as second instalment for sugarcane frp
Nagar News : ६० रुपये एक वार,दोन वार अन् तीन वार... श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पेरुला उच्चांकी दर, शेतकरी आनंदित

दरम्यान शेट्टी (raju shetti) यांनी सांगली येथे साम टीव्हीशी संवाद साधताना सरकार कारखानदारांना पाठीशी घालण्याची भूमिका घेत असल्याचे म्हटले. आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांचे उंबरटे झिजवले मात्र अंमलबजावणी हाेत नाही. त्यामुळे आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे आम्ही लढून चारशे रुपये मिळवून घेऊ तोपर्यंत यावर्षीचा सिझन आम्ही सुरू होऊ देणार नाही असा इशारा शेट्टी यांनी सरकारला दिला.

Raju Shetti, CM Eknath Shinde , Devendra Fadnavis, Kolhapur, sugar factories denies to give rs 400 as second instalment for sugarcane frp
Shirdi Sai Baba Darshan : बहुचर्चित दर्शन रांगेचे लोकार्पण हाेणार, शिर्डीच्या आमदारांनी काढला मुहूर्त

ते म्हणाले मागील हंगामामध्ये शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला ऊस पुरवला आहे. त्याची एफआरपी मिळाली आहे. मात्र अजून चारशे रुपये द्यावेत यासाठी आम्ही कोल्हापूरला मोर्चासुद्धा काढला होता. त्यावेळी आम्ही इशारा दिला होता. 2 ऑक्टोबरपर्यंत कारखान्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही चारशे रुपये का मागतो आम्ही आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन शेतकऱ्यांना सांगण्यासाठी आता पदयात्रा सुरू केली आहे.

शेट्टी म्हणाले सरकारचा अधिकार होता कारखान्याकडून पैसे घेऊन शेतकऱ्यांना द्यायचं पण सरकारने ते केलं नाही. शेतकऱ्यांचा काय आक्रोश आहे हे सरकारला कळावे यासाठी जन आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Raju Shetti, CM Eknath Shinde , Devendra Fadnavis, Kolhapur, sugar factories denies to give rs 400 as second instalment for sugarcane frp
Shambhuraj Desai News : पाटण नगरपंचायतीस एक कोटींचा निधी, मंत्री देसाईंनी मुख्याधिका-यांना दिली महिन्याची डेडलाईन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com