Raosaheb Danve On Pankaja Munde saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी ऑफर दिली तरी पंकजा मुंडे कुठेही जाणार नाहीत - रावसाहेब दानवे

Raosaheb Danve On Pankaja Munde: भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे, तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रसेने ऑफरही दिल्याची चर्चा आहे.

साम टिव्ही ब्युरो

Raosaheb Danve News: भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे, तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रसेने ऑफरही दिल्याची चर्चा आहे. या दरम्यान आता पाहाराष्ट्रात पाय रोवू पाहणाऱ्या बीआरएस पक्षाने देखील पंकजा मुंडे यांना खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे पक्ष या ऑफर्सकडे कशा बघतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आहे. गोपीनाथ मुंडे आणि मी भाजपचे फाउंडर मेंम्बर होतो. फक्त बीआरएसच नाही तर राष्ट्रवादीने देखील त्यांना ऑफर दिली आहे. काँग्रेसने देखील दिली, पण त्या सच्चा भाजपच्या आहेत. त्या कुठेही जाणार नाहीत. (Marathi Tajya Batmya)

पंकजा मुंडे या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. पक्षात त्यांना योग्य मानसन्मान दिला जातो. त्यामुळे त्या कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. ते मावळच्या दौऱ्यावर आले होते. तेथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. (Latest Political News)

कांद्याला अनुदान मिळवून देऊ

मागणी आणि पुरवठा यात तफावत आली तर भाव कोसळतात. खर आहे शेतकऱ्याला भाव मिळाला नाहीये. सरकारने कांद्याला अनुदान दिले कांद्याचे उत्पादन जास्त झालं आहे. अनुदान मिळालं नसेल तर आम्ही सरकारला सांगून अनुदान मिळवून देऊ आणि त्यांच्या खात्यात ते जमा करू असे रावसाहेब दानवे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT