पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी नुकतचं मोठं विधान केलंय...गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला...मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांची मोठी संख्या आहे...एक वेगळा पक्ष उभा राहिल एवढी ताकद असल्याचं विधान पंकजा मुंडेंनी केल्यानं राज्यात नव्या चर्चांना उधाणं आलंय.पक्षाने त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्यानंतर पुन्हा त्यांनी वाद ओढावून घेतला आहे..या विधानानंतर त्या वेगळा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत का अशी चर्चा रंगलीये....तर भुजबळांनी पंकजांच्या भूमिकेचं स्वागतं केलंय. मात्र राऊतांनी शुभेच्छा दिल्यात.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव झाला.त्यानंतर पक्षासह देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा कायम रोख होता. मंत्री पदाचा रुबाब, आमदारकी गेल्यानंतर पंकजा मुंडेंनी राड्यातल्या भाजप नेत्यांवर उघडपणे टीका केली.
भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती आणि संघटनेची जबाबदारी आल्यानंतर माझे नेते दिल्लीत आहेत, राज्यात माझा कोणी नेता नाही? इतपर्यंत त्यांनी भूमिका घेतली. राजकीय पुनर्वसन होऊनही पंकजांनी केलेल्या विधानाने पक्ष नेतृत्वाची वक्रदृष्टी पुन्हा त्यांच्यावर पडू शकते. त्यामुळेच की काय पंकजांनी लागलीच सारवासारव केली.
राजकारणात उत्स्फुर्त काही होत नसतं. आणि पंकजा मुंडेंच्या सारख्या अनुभवी नेत्या तर कोणतंही विधान विचार केल्याशिवाय करत नाहीत. त्यामुळे मुंडे समर्थकांना साद घालण्यामागे नेमकं काय कारण आहे? त्यांना पक्षनेतृत्वाला काही संदेश द्यायचाय का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.