Pankaja Munde Ahmednagar Vidhan Sabha News Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar News : पंकजा मुंडेंना अहमदनगरमधून विधानसभेचं तिकीट द्या; नक्कीच निवडून येतील, भाजप पदाधिकाऱ्याची मागणी

Pankaja Munde Ahmednagar Vidhan Sabha News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून तिकीट द्यावं, अशी मागणी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केली आहे

Satish Daud

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट द्या. त्या नक्कीच निवडून येतील, अशी मागणी भाजपचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहत आगरकर यांनी ही मागणी केली आहे. यामुळे पंकजा मुंडे यांना आमदारकीचं तिकीट मिळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी त्याचा पराभव केला. या पराभवानंतर आता पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी होत आहे.

अभय आगरकर यांनी पत्रात काय म्हटलंय?

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांना अहिल्यानगर मधून विधानसभा निवडणूकीचे तिकीट द्यावे, अशी मागणी अभय आगरकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. येणारी विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून लढवली तर त्या निश्चितच विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या लोककसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना नगर शहरातून चांगले मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे नगर शहरात भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण आहे. येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग शहर भारतीय जनता पक्षाने बांधला आहे.

त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या सारख्या संघर्षशील व लढवैय्या नेतृत्वाला जर नगर मधून विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिल्यास त्या निश्चितच विजयी होतील. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कायम नगर शहरावर प्रेम केले होते. त्यांचा कामाचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत आहेत. मुंडे परिवाराचे नगरशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असंही अभय आगरकर यांनी पत्रात म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

Viral Video: पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केल्याचा राग अनावर अन् मग लाथा- बुक्क्यांनी एकमेंकाना कुट-कुट कुटले; हाणामारीचा व्हिडिओ पाहा

Laapataa Ladies : ऑस्करसाठी 'लापता लेडीज'च्या दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय, थेट नावचं बदललं

Balasaheb Thorat: विशाल पाटील यांना मदत केली, भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली; शिवसेनेची मागितली माफी

SCROLL FOR NEXT