Ahmednagar News: मोठी बातमी! खासदार निलेश लंकेंच्या पीएला मारहाण प्रकरणी मोठी अपडेट, १२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Nilesh Lanke PA Rahul Jhaware Beating Case: खासदार निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे मारहाण प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल झावरे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
राहुल झावरे मारहाण प्रकरण
Nilesh Lanke PA Rahul Jhaware Beating CaseSaam Tv

सुशील थोरात, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांना काल (६ जून) पारनेर शहरातील आंबेडकर चौकात मारहाण झाली आहे. या प्रकरणी १२ आरोपींविरोधात पारनेर पोलिसांत भादवि कलम ३०७ आणि इतर कलमासह आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल झावरे (Rahul Jhaware) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहुल झावरे यांच्या वाहनाची तोडफोड करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर राहुल झावरे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Ahmednagar News) आहे.

मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी विजय औटी यांना लोकसभा निवडणुक प्रचारावेळी राहुल झावरे यांच्या वनकुटे गावातून हाकलून दिलं होतं. तो राग मनात धरून झावरे यांना मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटलं (Nilesh Lanke PA Rahul Jhaware Beating Case) आहे. राहुल झावरे हे खासदार निलेश लंके यांचे समर्थक आहेत, तर आरोपी विजय औटी हे सुजय विखेंचे कट्टर समर्थक आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी काल पारनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. तर मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी लंके समर्थकांनी पारनेर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

राहुल झावरे मारहाण प्रकरण
Nilesh Lanke: अहमदनगरमधून निलेश लंके विजयी, सुजय विखे-पाटील यांचा केला पराभव

दरम्यान पोलिसांनी आरोपी विजय औटी, नंदू औटी आणि इतर एकाला ताब्यात घेतले होतं. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. राहुल झावरे यांना मारहाण केल्याप्रकरणी (Nilesh Lanke) विजय औटी, नंदू औटी, प्रितेश पानमंद, अंकुश ठुबे, निलेश घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव औटी, मंगेश कावरे, पवन औटी, प्रमोद रोहकले, प्रथमेश रोहकले, सुरेश औटी आणि इतर ३ ते ४ अनोळखी व्यक्तींविरोधात पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

राहुल झावरे मारहाण प्रकरण
Nilesh Lanke: दिल्लीत इंग्रजीत भाषण करणार, विखेंच्या मंचावरील नेत्यांनीही केली मदत; विजयानंतर निलेश लंके नेमकं काय म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com