सुशील थोरात, साम टीव्ही अहमदनगर
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण करणार आहेत. विजयानंतर निलेश लंकेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की, सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकलाय, तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी पुढील पाच वर्ष त्यांचा सेवक म्हणून काम करणार आहे.
सुजय विखे यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इंग्रजी भाषेवरून निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. यालाच आता लंकेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी थेट दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण करणार (MP Nilesh Lanke Will Speech In English) असल्याचं म्हटलं आहे. सुजय विखेंना यंदा निलेश लंकेंनी पराभवाची धूळ चारली आहे. सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये मोठी चुरशीची लढत नगरमध्ये झाली आहे.
पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचं निलेश लंकेंनी म्हटलं आहे. शेतकरी सुखी झाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि माझ्या मतदारसंघात (Ahmednagar) पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी उद्यापासूनच कामाला लागणार असल्याचं निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले आहेत. त्यांनी विजयाचे श्रेय हे महाविकास आघाडीतील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाने देखील हातात घेतल्याचे लंके म्हणाले आहेत.
तर पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासोबत माझं फोनवरून बोलणं झालं आहे. मी त्यांना भेटण्यासाठी कधी येऊ विचारले असता दिल्लीला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी मला दिल्ली शिकवतो, असं म्हटलं असल्याचं लंके यांनी सांगितलं आहे. आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण देखील करणार असल्याचं निलेश लंके म्हणाले आहेत. तसेच भाजप उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली. मात्र, आता त्यांचं नाव घेणं योग्य ठरणार नाही असं म्हणत लंकेंनी गौप्यस्फोट देखील केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.