Nilesh Lanke: एकदा संधी द्या, शेतकरी प्रश्नांवर संसद बंद पाडणार.. निलेश लंकेची साद; शरद पवारांचा विखे पिता- पुत्रांवर हल्लाबोल

Ahmednagar Sharad Pawar Sabha: राहुरीमध्ये झालेल्या या विराट सभेत बोलताना निलेश लंके यांनी ४जूनला विजय आपलाच होणार, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
Ahmednagar Sharad Pawar Sabha:
Ahmednagar Sharad Pawar Sabha:Saamtv

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. २५ एप्रिल २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नगर- दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची जाहीर सभा झाली. राहुरीमध्ये झालेल्या या विराट सभेत बोलताना निलेश लंके यांनी ४जूनला विजय आपलाच होणार, असा विश्वास व्यक्त यावेळी व्यक्त केला.

काय म्हणाले निलेश लंके?

"ज्यांना शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीत पाठवल त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला नाही. खोटे बोला पण रेटून बोल ही त्यांची सवय आहे. अमित शहांना भेटून आले आणि निर्यातबंदी उठवल्याचे सांगितले. सत्कार करून घेतले आणि नंतर कळाले बातमी खोटी आहे, असा टोला त्यांनी सुजय विखे यांना लगावला.

"मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. एकदा संधी द्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही संसद बंद पाडली तर मग बोला. व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा विकासावर बोला. एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. अभिमान वाटेल असे काम करून दाखवील. आमदार झाल्यावर लोकांची संपत्ती वाढते. मी कर्जबाजारी झालो. असे म्हणत 13 तारखेला अशी तुतारी वाजवा की दिल्लीवाल्यांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत, असे आवाहन यावेळी निलेश लंके यांनी केले.

Ahmednagar Sharad Pawar Sabha:
Girish Mahajan News : आता जनताच त्यांना मतदानातून उत्तर देतील; गिरीश महाजन यांचे संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर

शरद पवारांचा विखेंवर हल्लाबोल..

"विखे पाटलांनी सहकारी साखर कारखाना काढला. पण नंतरच्या पिढीने काय केले? सत्तेची मस्ती यांच्या डोक्यात गेलीय. निळवंडे धरणासाठी आम्ही लक्ष घातले. यांच्या वाडवडिलांनी धरणाच्या कामाला विरोध केला. जिल्ह्यात सत्तेचा गैरवापर आणि दमदाटी सुरू आहे. दिल्लीत नुसती तुतारी वाजणार नाही. तर तुतारी वाजवायला माणूसही पाहिजे," असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

Ahmednagar Sharad Pawar Sabha:
Madha Constituency : मोठा हुंडा मागितल्यानं लग्न मोडलं; फडणवीसांच्या भेटीवरून शहाजी बापूंचा जानकरांना चिमटा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com