Madha Constituency : मोठा हुंडा मागितल्यानं लग्न मोडलं; फडणवीसांच्या भेटीवरून शहाजी बापूंचा जानकरांना चिमटा

Madha Constituency latest news : उत्तम जानकर यांची नाराजी दूर झाली नाही. उत्तम जानकर यांच्या नाराजीनाट्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिमटा काढला आहे.
Madha Constituency
Madha ConstituencySaam tv

पंढरपूर : राज्यात माढा लोकसभा मतदारसंघावरून जोरदार चर्चा होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांच्या नाराजीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. नाराज उत्तम जानकर यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतरही उत्तम जानकर यांची नाराजी दूर झाली नाही. उत्तम जानकर यांच्या नाराजीनाट्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिमटा काढला आहे.

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, 'उत्तम जानकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी विशेष विमानाने नागपूर येथे गेले होते. यावेळी आपणही सोबत होतो. जानकरांचं भाजपशी लग्न जुळत आले होते. पण नवरदेवाने हुंडा जास्त मागितला. हुंडा ऐकून आम्ही बेशुद्ध पडायचे राहिले होतो, असे म्हणत उत्तम जानकर आणि फडणवीस यांच्या भेटीचा गौप्यस्फोट आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.

Madha Constituency
Sugar mills : मोठी बातमी! लोकसभा निवडणुकांआधीच राज्यातील २१ साखर कारखान्यांना मिळाली कर्जाची गॅरंटी

उत्तम जानकर यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. यानंतर जानकर आणि फडणवीस भेटीवेळी उपस्थित असणारे आमदार शहाजी बापू पाटील यांनी भेटीबद्दल प्रतिक्रिया दिली. जानकर यांनी हुंडा मागितल्यावर फडणवीस यांनी आपण तत्त्वशील राजकारण करणार असल्याचे सांगितले, असे शहाजी बापू यांनी सांगितलं.

अकलूजचे मोहिते पाटील म्हणजे रावणाचा आत्मा : शहाजी बापू

'रामाने लंकेत रावणाला धनुष्य बाणाने मारले. रामाने मारल्यावर रावणाचा आत्मा भरकटत...भरकटत अकलूज येथे येऊन पडला. तिथं रावण जन्माला आला. आता या मतदारसंघात पुन्हा रावण जन्माला घालायची नाहीत. यासाठी आम्ही रामाच्या पाय पडत आहे, अशा शब्दात मोहिते पाटील यांच्यावर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोचरी टीका केली आहे.

तत्पूर्वी, माढा मतदारसंघाचे राजकारण तापत असताना आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यामध्ये आमदार शहाजी पाटील यांची भाषणे सध्या गाजताना दिसत आहे.

Madha Constituency
Lok Sabha Election 2024 : कोण मारणार बाजी? लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि 21 लाख जिंका : अंनिसचं आव्हान

'माळशिरसचे उत्तम जानकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काही संबंध नाही'

माळशिरसचे उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद देखील नाहीत. त्यामुळे त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा काही एक संबंध नाही. त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आज दिले आहे.

उत्तम जानकर यांनी अलीकडेच महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय. यावेळी त्यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे. तसेच अजित पवारांचा पराभव करून मी पक्ष सोडणार, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जानकर यांनी पुन्हा अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

'अजित पवारांना मी कोणत्याही क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढू शकतो, असेही विधान केले होते. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कधीच नव्हते ते सभासद देखील नाहीत. त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर आता जानकर काय उत्तर देतात हे पाहावं लागेल.‌

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com