Pankaja munde Mahadev Jankar lok Sabha election Result 2024 Saam TV
महाराष्ट्र

Beed Politics News : पंकजाताई आणि माझा विजय ठरलेला, एक्झिट पोल काहीही असू द्या, महादेव जानकरांचं मोठं विधान

Mahadev Jankar Shocking Statement : आम्ही सर्व समाजाला घेऊन पुढे चाललो आहेत. उद्या पंकजाताई आणि माझा विजय ठरलेला आहे, असं विधान महादेव जानकर यांनी केलं.

विनोद जिरे

एक्झिट पोलची आकडेवारी काहीही असू द्या, उद्या माझा आणि पंकजाताईंचा विजय होणार, असा विश्वास महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. आमचा विजय ठरलेलाच आहे, असंही जानकर यांनी म्हटलं आहे. ते बीडच्या गोपीनाथ गडावरून बोलत होते.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन वंदन केले. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "गोपीनाथ मुंडे हे आमचे आयडॉल आहेत . मुंडे साहेबांमुळेच बहुजनातील लोकांना सत्तेचा वाटा मिळाला", असं जानकर म्हणाले.

आम्ही ३ जून आणि १२ डिसेंबरला कुठेही असलो, तरी गोपीनाथ गडावर येऊन नेहमीच दर्शन घेतो. मी आणि पंकजाताई खासदार होऊन पुन्हा साहेबांच्या दर्शनाला येणार आहे. आम्ही सर्व समाजाला घेऊन पुढे चाललो आहेत. उद्या पंकजाताई आणि माझा विजय ठरलेला आहे, असं विधान देखील जानकर यांनी केलं.

एक्झिट पोल काहीही असू द्या आम्ही उद्या विजयी होऊन गोपीनाथ गडावर खासदार म्हणून वंदन करण्यासाठी येणार आहोत, असा विश्वास देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केला. दुसरीकडे स्वर्गवासी होण्यापूर्वी त्या दिवशी पहाटे ५ वाजेच्या सुमारास साहेबांचा फोन आम्हाला आला होता. त्या आठवणीत आम्ही आजही दचकून जागे होतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मुंडे साहेबांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे काम आम्ही करू शकलो. हा गोपीनाथ गड मी उभारू शकले, माझ्या आयुष्यातलं हे सर्वात मोठं योगदान आहे. असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. ओपिनियन पोल मधील विजय होत असल्याचा पाहून मला आनंद "जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत", अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, दुर्घटनेचा व्हिडिओ आला समोर! १० जणांचा मृत्यू

Beauty Tips: Eyebrowचे केस अचानक गळतायेत अन् बारिक दिसतायेत? मग या टिप्स नका करा फॉलो

Nutrition Tips: डोक्यात वाईट विचार का येतात? या' व्हिटॅमिनची कमतरता असल्यास आरोग्यावर होतो परिणाम

Jay Bhanushali-Mahhi Vij : घटस्फोटाच्या चर्चांवर माही विजने मौन सोडलं, VIDEO शेअर करून सर्व सांगितलं

Maharashtra Live News Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

SCROLL FOR NEXT