Maharashtra Politics : उद्धव ठाकरे १५ दिवसांतच मोदींसोबत जातील; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर

Sanjay Raut on Ravi Rana : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर उद्धव ठाकरे १५ दिवसांतच त्यांच्यासोबत जातील, असा दावा आमदार रवी राणा केला होता. त्यांच्या दाव्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे १५ दिवसांतच मोदींसोबत जातील; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर
Sanjay Raut on Ravi RanaSaam TV

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक खळबळजनक दावा केला. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर उद्धव ठाकरे १५ दिवसांतच त्यांच्यासोबत जातील, असं राणा यांनी म्हटलं. दरम्यान, रवी राणा यांच्या या दाव्याला संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर दिलंय.

उद्धव ठाकरे १५ दिवसांतच मोदींसोबत जातील; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर
Maharashtra Politics : एक्झिट पोल गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, ४ जूनला INDIA आघाडीच जिंकणार; ठाकरे गटाला विश्वास

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी रवी राणा यांनी केलेल्या दाव्यावर राऊत म्हणाले, "शिवसेना पक्ष हा देशातील राजकारणातला सर्वात जुना पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष स्थापन केलेला आहे. गेल्या २५ वर्षांपासून उद्धव ठाकरे या पक्षाचं नेतृत्व करत आहेत".

"मागच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे १८ खासदार निवडून आलेले आहेत. या निवडणुकीतही ते निवडून येतील. अशा पक्षाच्या भूमिकांवरती कुणी काहीही बोलावं, हे बरोबर नाही. रवी राणा यांचा राजकारणाशी काहीही संबंध आला नाही. त्यांनी फक्त त्यांचं बघावं", असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, "रवी राणा यांनी त्यांची निवडणूक लढवावी. उगाच आमच्या नांदाला लागू नये. आमच्या भूमिका काय आहे, हे आम्ही एकत्रित बसून ठरवतो आणि त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेतात".

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ध्यानधारेवरही टीका केली. "नरेंद्र मोदी यांच्याकडे फक्त कॅमेऱ्यांचं लक्ष होतं. बाकी देशातील सर्व जनतेचे ध्यान आमच्याकडे होते. कारण, आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित आलो आहोत. महाराष्ट्रात आमच्या ३० पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरे १५ दिवसांतच मोदींसोबत जातील; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर
Pune Lok Sabha 2024 : 'खबर पक्की विजय नक्की', निकालाआधीच पुण्यात झळकले रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com