Pandharpur Ashadhi Ekadashi Vari 2023 saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2023: आषाढी वारीसाठी सरकार सज्ज! सार्वजनिक बांधकाम मंत्री करणार पायी मार्गाची पाहाणी

Ashadhi Wari 2023: आषाढी वारीसाठी सरकार सज्ज! सार्वजनिक बांधकाम मंत्री करणार पायी मार्गाची पाहाणी

साम टिव्ही ब्युरो

Pandharpur Ashadhi Ekadashi Vari 2023: आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होता. देहू येथून तुकाराम हाराजांची तर आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसह राज्यातून संतांच्या पालख्या पंढरपुरमध्ये दाखल होता. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून देखील तयारी करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शुक्रवारी पालखी सोहळ्याच्या पायी मार्गाची पाहणी करणार आहेत.

मंत्री रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा सकाळी 11 वाजता सासवडवरून येथून सुरू होणार आहे. येथील पालखी मार्गाची ते सर्वप्रथम पाहणी करतील. पालखी मार्गातील पालखी थांबे आणि मुक्कामाच्या ठिकाणांचा आढावा चव्हाण घेणार आहेत. तसेच वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर नियोजित करण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांची ते पाहणी करतील. तसेच सासवड ते पंढरपूर पालखी मार्गाची देखील ते पाहणी करणार आहेत.

वारकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

यंदा 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. अनेक वारकरी हे पायी चालत आलेले असतात. त्यामुळे पंढरपुरमध्ये आल्यानंतर अनेकांना आरोग्याशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या आषाढी वारीला राज्य सरकारकडून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पंढरपूर येथील यात्रेत राज्य शासनाच्या वतीने 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हे महाआरोग्य शिबीर राबवले जाणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याविषयी माहिती दिली आहे. (Breaking News)

महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार

तानाची सावंत यांनी सांगितले की, यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात प्रथमच राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' ह्या संकल्पनेवर आधारित हे महाआरोग्य शिबीर २८ आणि २९ जून रोजी पंढरपुरात राबवण्यात येणार आहे. या शिबिरात सुमारे २० लाख भाविकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथकं बोलण्यात येणार आहे. पंढरपुरात ३ ठिकाणी हे आरोग्य शिबिर राबवले जाईल. (Latest Political News)

वारकरी भक्तांना सकस आहार

आरोग्य शिबिरासोबतच वारकरी भक्तांना सकस आहार देखील दिला जाणार आहे. याबाबत आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. आषाढी यात्रेमध्ये राज्य शासनाचे विविध कार्यक्रम आजपर्यंत राबवले गेले. मात्र आरोग्य शिबिरसारखा लोकोपयोगी उपक्रम प्रथमच पंढरपूर येथे राबवला जाणार असल्याचे तानाची सावंत म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

SCROLL FOR NEXT