Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघातापूर्वीचा थरकाप उडवणारा Video व्हायरल, भयानक दृष्य कॅमेऱ्यात कैद

Coromandel Express collided VIDEO: ओडिशातील रेल्वे अपघात देशाच्या रेल्वे अपघातातील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. आता या अपघातापूर्वीचा ट्रेनमधील एक व्हिडिओ समोर आला आहे.
Coromandel Express collided VIDEO
Coromandel Express collided VIDEOsaam tv
Published On

Odisha Train Accident Video Goes viral: ओडिशातील बहनगा बाजार स्थानकाजवळ झालेल्या तीन भीषण रेल्वेंच्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हळहळला होता. या अपघातात आडीचशेहून अधिक प्रवाशांना आपले प्राण गमावावे लागले, तर शेकडो प्रवाशी जखमी झाले होते. हा रेल्वे अपघात देशाच्या रेल्वे अपघातातील सर्वात मोठी घटना मानली जात आहे.

आता या अपघातापूर्वीचा ट्रेनमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वे अपघाताबाबतचा हा एक व्हिडिओ समोर आला आहे. अपघाताच्या काही सेकंद आधीचा हा विडिओ असल्याचा दावा केला जात आहे.

Coromandel Express collided VIDEO
Maharashtra Politics: भाजपचं मिशन २०२४! मतदार संघ निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर; 'या' दिग्गजांकडे पुणे, बारामतीची जबाबदारी

या व्हिडीओमध्ये सफाई कर्मचारी डब्यातील फरशी साफ करताना दिसत आहे. काही प्रवासी त्यांच्या बर्थवर बसून मोबाईलमध्ये पाहाताना दिसत आहेत तर काही प्रवाशी त्यांच्या बर्थव आराम करताना तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता.

अपघाताआधी रेल्वेत आराम करत असलेल्या या प्रवाशांच्या कल्पनेतही हा अपघात आला नसेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अचानक मोठ्ठा धक्का बसतो आणि सर्वंत किंचाळ्यांचे आवाज येऊ लागतात. यानंतर काही वेळाने कॅमेरा देखील बंद होतो. हा व्हिडिओ संपण्यापूर्वीचं दृष्य अंगावर शहारे आणणारं आहे. हा व्हिडिओ एका प्रवाशाने रेकॉर्ड केला असल्याचा दावा केला जात आहे. (Breaking News)

Coromandel Express collided VIDEO
Nagpur News: ज्येष्ठ पत्रकार अरूण फणशीकर यांचा मृत्यू, विहिरीत पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बालासोर रेल्वे अपघातात निष्काळजीपणाच्या आरोपांसंदर्भात केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे (CBI) पथक तपास करत आहे. 2 जून रोजी संध्याकाळी 7:10 वाजता हा अपघात झाला. या अपघातात तीन ट्रेनच्या धडकेत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 1175 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 793 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून १० लाख रुपयांची मदत दिली जात आहे. मृतदेहाची ओळख पटताच 9.5 लाख रुपये रकमेचा चेक आणि 50 हजार रुपये रोख देण्यात येत आहेत. (Latest Marathi News)

येथे पाहा व्हिडिओ....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com