vitthal temple land issue Saam tv
महाराष्ट्र

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

vitthal temple land issue : विठ्ठलाच्या चरणी अर्पण झालेल्या जमिनीवरून पंढरपुरात वाद सुरू झालाय? 450 कोटींच्या जमिनीवर नेमका कोणी आणि का दावा केलाय? वहिवाटदार आणि मंदिर समिती आमने-सामने कसे आलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिर समितीच्या नावावर राज्यभरात शेकडो एकर जमीन आहे. यातीलच एक महत्त्वाची जमीन पंढरपूर जवळील अनवली गावात आहे. तिथल्या तब्बल 150 एकर जमिनीवरून मंदिर समिती आणि बडवे कुटुंबात पुन्हा एकदा वाद पेटलाय़... 450 कोटींच्या जमिनीच्या वादाचा इतिहास नेमका काय आहे? पाहूयात....

1849 मध्ये सांगली संस्थाननं अनवली गावातील 150 एकर जमीन बडवे कुटुंबाला 'इनाम' म्हणून दिली...तेव्हापासून ही जमीन बडवे कुटुंब कसत होते...मात्र ही जमीन विठ्ठल मंदिर समितीची असल्यानं दिवाणी न्यायालयात जमिनीवरून वाद सुरु होता... नुकताच या दाव्याचा निकाल मंदिर समितीच्या बाजूने लागला...त्यामुळे मंदिर समितीने तातडीने या 450 कोटींच्या जमिनीचा ताबा घेत तिथे दुरुस्ती सुरू केली. ही जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी अर्जही मागवले. मात्र ब़डवे कुटुंबियांनी जमिनीवरील दावा कायम ठेवत फलक लावल्यानं वाद चिघळला...

दिवाणी न्यायालयाच्या निकालानंतरही वहिवाटदार मदन विश्वनाथ बडवे यांच्यासह इतर 12 जणांनी या जमिनीवर आपला दावा ठोकलाय. महसूल विभागाला हाताशी धरून मंदिर समितीचे सातबारा उताऱ्यावर नाव लावल्याचा आरोप बडवे कुटुंबाने केलाय...

एकीकडे मंदिर समिती या जमिनीवरून बेकायदेशीर अतिक्रमणं हटवण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे बडवे कुटुंब या जमिनीवरचा आपला हक्क सोडायला तयार नाही. 2014 नंतर शांत झालेला हा वाद आता जमिनीच्या तुकड्यावरून पुन्हा एकदा उफाळून आल्यानं पंढरपुरात सध्या या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र विठ्ठलाच्या चरणी अर्पण झालेल्या जमिनींवरून असे वाद होणं हे दुर्दैवी आहे. आता न्यायालयीन लढाईत मंदिर समितीच्या बाजूनं निकाल लागला असला तरी बडवे कुटुंबाने घेतलेली आक्रमक भूमिका पाहता हा वाद येणाऱ्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात आता पोलीस प्रशासन आणि न्यायालय काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

जगावर पुन्हा मोठं संकट कोसळणार; महायुद्धाचा भडका उडणार, वैश्विक राजकारणात नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT