Pandharpur saam tv
महाराष्ट्र

Pandharpur: माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीमय सोहळा, लाखो भाविकांच्या साक्षीने विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न

Vitthal Rukmini Nityapuja: माघी एकादशी निमित्त पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भक्तीमय वातावरण झाले. मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांनी विठ्ठलाची, तर संभाजी शिंदे यांनी रुक्मिणी मातेची सपत्नीक नित्यपूजा करून विधी पार पाडले.

Dhanshri Shintre

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात माघी एकादशीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांनी सपत्नीक विठ्ठलाची नित्यपूजा, तर संभाजी शिंदे यांनी रुक्मिणी मातेची नित्यपूजा केली. राज्यभरातून सुमारे चार लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

माघी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर विविध प्रकारच्या फुलांनी सजविण्यात आले आहे. पुण्यातील भाविक सतीश चव्हाण यांनी ही आकर्षक सजावट केली असून झेंडू, गुलाब, मोगरा, जाई-जुई आणि ष्टर यांसारख्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. गाभारा, सभा मंडप, नामदेव पायरी यांसह मंदिरातील विविध ठिकाणी केलेल्या फुलांच्या मनमोहक सजावटीने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

माघी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील वातावरण भक्तिमय बनले होते. पहाटेपासूनच वारकरी आणि भाविक चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून संतांच्या अभंगाच्या जयघोषात नगरप्रदक्षिणा करताना दिसले. शेकडो वारकऱ्यांनी दिंड्या घेऊन पारंपरिक पद्धतीने संत अभंग म्हणत प्रदक्षिणा पूर्ण केली. चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आणि ६५ एकर मंदिर परिसरात टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती.

भाविकांनी चंद्रभागा स्नान, कळस दर्शन, नगरप्रदक्षिणा आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पाददर्शन व मुखदर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली. विविध फुलांनी सजलेले मंदिर, भक्तांच्या टाळ-मृदुंगाच्या आवाजाने भरलेला परिसर, आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीरसात न्हालेली पंढरपूर नगरी यामुळे माघी एकादशीचे पवित्र पर्व भक्तांसाठी खास ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT