Indore: इंदूरची रात्रीची खासियत, रात्री ८ ते पहाटे ३ पर्यंत सराफा बाजारातील स्ट्रीट फूडची मेजवानी, एकदा नक्की ट्राय करा

Indore Street Food: इंदूरमध्ये रात्री फेरफटका मारण्यासाठी सराफा बाजार ही सर्वोत्तम जागा आहे. दागिन्यांच्या दुकानांना कुलूप लागल्यानंतर, येथे खाण्याच्या स्टॉलची गर्दी जमते आणि रात्रीचा बाजार खाद्यप्रेमींसाठी जणू स्वर्ग बनतो.
Indore
Indoresaam tv
Published On

अक्षय बडवे/ साम टीव्ही न्यूज

इंदूर शहरात जर तुम्ही रात्रीच्या वेळी कुठे फेर फटका मारणार असाल तर ही जागा तुमच्या यादीत सर्वात प्रथम क्रमांकावर ठेवा. कारण असं म्हणतात इथे आलं नाही तर इंदूरची सहल अपूर्ण राहते. या जागेचे नाव आहे सराफा बाजार. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला काही सोनं, चांदी घेण्यात रस नाही आणि ते सुद्धा दुसऱ्या राज्यात जाऊन पण या भागाच्या नावावर जाऊ नका कारण सराफा बाजार म्हणजे इथली भव्य दिव्य खाऊ गल्ली.

सराफा बाजारात तुम्हाला अनेक चवदार पदार्थ चाखायला मिळतील, पण आता तुम्ही म्हणाल की सराफा बाजार म्हणाल्यावर साहजिकच तिथे सरांफाचे काहीतरी असेलच की, आहे ना, या भागात सगळी सोन्या, चांदीच्या दागिन्यांची दुकाने आहेत. रात्री जेव्हा दागिन्यांची दुकानं बंद होतात त्यानंतर तिथे खाण्याची दुकानं म्हणजे स्टॉल उभारले जातात. काही खाण्याचे पदार्थ जे इंदूरला मिळतात आणि जी चव त्या पदार्थांना असते ती गजब म्हणावी लागेल.

Indore
Palghar: दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना शिक्षकाला रडू आलं, अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू

साधारण २ ते ३ किलोमीटर अंतरात पसरलेला या बाजारात तुम्हाला विविध प्रकारची पदार्थांची मेजवानी मिळेल आणि ती सुद्धा अल्पदरात. समोसा, आलू टिक्की, पराठा, दही वडा खाण्यासाठी या ठिकाणी ८ वाजताच गर्दी सुरू व्हायला सुरुवात होते. पण यापलीकडे जाऊन इथले प्रसिद्ध स्ट्रीट फूडची बातच काही वेगळी आहे. या स्ट्रीट फूडमध्ये काही पदार्थ एकदम नवीन पाहायला मिळतात.

Indore
Maharashtra Weather: पुढील 24 तासांत राज्यात उष्णतेचा कहर, पाहा कोणत्या भागात तापमानात वाढ

यातील गराडू हे साधारण २० रुपयांपर्यंत मिळते. आता हा पदार्थ म्हणजे सुरण सारखे एक कंद या भागात प्रामुख्याने थंडीत उपलब्ध असते. त्याची बारीक कापं करून ती तळून त्यावर एक मसाला टाकून लिंबू पिळत तुम्हाला देतात. हलकासा हा तिखट पदार्थ चमचमीत लागतो. दुसरा खमंग पदार्थ म्हणजे भूटयाचा कीस, हे म्हणजे मक्याचे पोहे. हलकेसे तिखट पण खिशाला परवडणारे. इंदूरची कचोरी सुद्धा प्रसिद्ध आहे. आकारानी पुरी सारखी दिसणारी ही कचोरी भरपूर सारणाने भरलेली असते. चटपटीत असणाऱ्या कचोरीवर गोड चटणी आणि दही घालून आइस्क्रीमच्या स्टिकने खातात. तिखट, आंबट पदार्थांच्या यादीत इथले आलू टिक्का, सँडविच, बटाटा ट्विस्टर, सोया चाप, पराठा, दाबेली, इंदोरी पोहे (फक्त सकाळी) याला सुद्धा तुम्ही "लेट्स गिव ट्राय" म्हणू शकता. इथे जोशीचे दही वडे या दुकानात पण तुम्ही एकदा चक्कर मारू शकता.

Indore
Accident News: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; लक्झरी बसची कंटेनरला मागून धडक, ४०-५० प्रवासी गंभीर जखमी

आता तिखट पदार्थ पोटात गेलं की त्यावर गोडधोडाची मेजवानी तर झालीच पाहिजे ना. जिलेबी, गुलाबजाम, मालपुआ यापलीकडे जात इथे मावाबाटी नावाचा "वाढीव" पदार्थ आहे. हा म्हणजे गुलाब जाम सारखाच पण आकाराने त्याचा तिप्पट आणि त्यात दुधापासून तयार झालेला मावा सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. गुलाबजाम विथ रबडी म्हणजे एक घास खाताच तुम्ही वेगळ्याच ट्रान्समध्ये जाता, हा तर इथला फेवरेट आहे. आता तुम्ही कॅलरी मोजणार नसाल तर इथली जिलेबी नक्की खा. ही जिलबी मैद्याची नसून खवा आणि माव्यापासून बनवलेली असते आणि प्रचंड गोडाची.

Indore
Health Alert: सावधान! जर तुम्ही 'हे' अन्न रोज खात असाल, तर कर्करोगाचा धोका वाढू शकतो

असा हा सराफी बाजार रात्री ८ वाजल्यापासून सुरू होतो ते जवळपास पहाटे ३ पर्यंत सुरू राहतो. दिवसा सराफी व्यावसायिकांचे याठिकाणी दुकाने असतात पण रात्री लखलखीत प्रकाशात ही खाऊ गल्ली फक्त तरुणांसाठी नाही तर फॅमिली ट्रीट आहे. अगदी २० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंतचे खाण्याचे पदार्थ तुम्हाला या खाऊ गल्लीत नक्की मिळतील. त्यामुळे इंदूरमध्ये आल्यावर फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा या बाजारात स्ट्रीट फूडचा अनुभव एकदा नक्की घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com