Pandharpur Vitthal Rukmini Sparsh Darshan Bandh From 15 March Saam Tv
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Darshan: विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन शुक्रवारपासून राहणार बंद, जाणून घ्या कारण

Pandharpur Vitthal Rukmini Mandir Latest Marathi News या कामाच्या काळात देवाच्या मूर्तीला काचेचे आवरण केले जाणार आहे अशी माहिती विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने दिली.

भारत नागणे

Pandharpur News:

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर (vitthal rukmini mandir pandharpur) परिसरात मंदिर संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. या मंदिरातील गाभारा दुरूस्तीसाठी येत्या शुक्रवारपासून (ता.15 मार्च) विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माध्यमांना दिली. (Maharashtra News)

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या काम वेगाने सुरू झाले आहे. या मंदिरातील गाभारा दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

यामुळे मंदिर समितीने येत्या 15 मार्चपासून सुमारे दीड महिना देवाचे पदस्पर्श दर्शन बंद (pandharpur vitthal rukmini padh sparsh darshan bandh from 15 march) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना देवाचे केवळ मुख दर्शन घेता येईल. या कामाच्या काळात देवाच्या मूर्तीला काचेचे आवरण केले जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंदिरामध्ये सर्व नित्योपचार सुरू राहणार आहेत. सकाळी पाच ते 11 पर्यंत भाविकांना मुख दर्शन घेता येईल असेही मंदिर समितीने स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

MNS- Shivsena: ठाकरे बंधू आज करणार युतीची घोषणा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; मनसे अन् शिवसेना किती जागांवर लढणार?

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरूवारपासून सेवेत, बंगळूरूहून येणार पहिलं विमान, वाचा सविस्तर

Zodiac signs fortune: 24 डिसेंबरचा दिवस ठरणार करिअर टर्निंग पॉइंट? ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार

Tirgrahi Yog: 200 वर्षांनी मकर संक्रातीला बनणार त्रिग्रही राजयोग; या राशींच्या व्यक्तींना मिळणार धनदौलत आणि राजेशाही सुख

SCROLL FOR NEXT