Pandharpur Woman Death Wrong Blood Transfusion Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: प्रसुतीदरम्यान प्रचंड वेदना, चुकीचं रक्त दिल्याने विवाहितेचा मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

Pandharpur Woman Death Wrong Blood Transfusion: पंढरपुरमध्ये एका महिलेचा प्रसुतीदरम्यान चुकीचे रक्त दिल्यामुळे मृत्यू झाला. महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्रावर गंभीर आरोप केले.

Priya More

Summary -

  • प्रसुतीदरम्यान चुकीचं रक्त चढवल्यामुळे महिलेचा मृत्यू

  • २२ वर्षीय आरती चव्हाण या महिलेचा दुर्दैवी मृत्यू

  • नातेवाईकांनी डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्रावर गंभीर आरोप केले

  • रक्त चढवल्यानंतर महिलेला त्रास होऊ लागला त्यानंतर तिचा मृत्यू झाला

पंढरपुरमध्ये प्रसुतीसाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल असलेल्या या महिलेला आवश्यक ती चाचणी न करता रक्त चढवल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टांच्या आणि रक्त संकलन केंद्र चालकाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झालाअसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे पंढरपुरमध्ये खळबळ उडाली आहे.

आरती सूरज चव्हाण (वय २२ वर्षे) असं मृत झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. आरती चव्हाण ही गर्भवती महिला प्रसुतीसाठी पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांनी कुटुंबियांना तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितलं. त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आलं. मात्र, रक्त चढवल्यानंतर तिचा त्रास आणखीच वाढत गेला आणि ३ दिवसांनंतर तिचा सोलापूर येथील रूग्णालयात मृत्यू झाला.

या घटनेनंतर पंढरपुरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रात्री उशिरा अन्न व औषध प्रशासनाने रुग्णालयातील डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्रातील टेक्निशियनचे लेखी जबाब घेतले आहेत. दरम्यान रूग्णालयात रक्त पुरवठा करणाऱ्या संबंधित रक्त संकलन केंद्राचे कामकाज त्वरीत थांबवण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. आरती चव्हाण यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. रुग्णालय आणि रक्त संकलन केंद्राविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update: विक्रोळीत ठाकरे गटाच्या श्वेता पावसकर विजयी

Nisha Parulekar: अभिनय क्षेत्रातून थेट राजकारणात उडी; मुंबईच्या नगरसेविका निशा परुळेकर कोण आहेत?

Chanakya Niti: श्रीमंत होण्याआधी माणसाच्या विचारांमध्ये कोणते बदल केले पाहिजेत?

Satara Tourism : साताऱ्यातील 'हे' तलाव जणू मिनी काश्मीर, हिवाळ्यात बहरतो निसर्ग

Pune Municipal Corporation Results: पुणे महापालिकेत भाजच बनला 'बाजीराव'; वाचा विजयी उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT