Sugar Factory Saam tv
महाराष्ट्र

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

Pandharpur News : राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. परंतु यंदा हे साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत.

भारत नागणे

पंढरपूर : यावर्षी तीव्र उन्हाळा आणि त्यातच उजनीचे चुकलेले पाणी नियोजन यामुळे सोलापूर जिल्ह्यात ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे. परिणामी यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांवर देखील मोठे संकट निर्माण झाले आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. परंतु यंदा हे साखर कारखाने (Sugar Factory) अडचणीत सापडले आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाला होता. त्यामुळे उजनी धरण ७० टक्के भरले होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फटका ऊस शेतीला बसला आहे. पाण्याची समस्या सर्वदूर असल्याने शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात देखील पाणी टंचाई जाणवत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे.  

सध्या तीव्र पाणी टंचाईमुळे पंढरपूर (Pandharpur) परिसरातील ऊस पिके पाण्याअभावी फडातच जळून गेली आहेत. तसेच टनाला ३ हजार भाव घेणारा ऊस सध्या वैरणीला ५०० रूपये गुंट्यानुसार विकला जात आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने साखर पट्यातील शेतकरी (Farmer) चिंताग्रस्त आहे. ऊस कमी झाल्याने अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत.‌

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT