Ranjeetsingh Naik Nimbalkar, BJP MP SAAM TV
महाराष्ट्र

Pandharpur Political News : भाजपने दरवाजे उघडे केले तर...; भाजप खासदाराचा मोठा दावा

Solapur Politics News : महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये नेते, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग आणि आउटगोइंग जोरात सुरू असतानाच भाजपच्या खासदारानं मोठा दावा केला आहे.

Nandkumar Joshi

भारत नागणे, पंढरपूर

Solapur Politics News : महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये नेते, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग आणि आउटगोइंग जोरात सुरू असतानाच भाजपच्या खासदारानं मोठा दावा केला आहे. भाजपने दरवाजे उघडे केले तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकही नेता शिल्लक राहणार नाही, असे भाजप खासदार रणजीतसिंह निंबाळकर म्हणाले. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीची अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. भाजपने दरवाजे उघडे केले तर, समोरच्या विरोधी पक्षात हाड म्हणायला एकही नेता शिल्लक राहणार नाही, असा दावा‌ माढ्याचे भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी आज केला.

खासदार निंबाळकर यांनी माढा येथे पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ या सभेवरही निशाणा साधला.

विरोधकांची अस्तित्वासाठीची लढाई सुरू आहे. वारूळातून मुंग्या कशा बाहेर पडतात, त्याप्रमाणे महाविकास आघाडी फुटू लागली आहे. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो, तशी अवस्था सत्ता गेल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची झाली आहे. भाजपने दरवाजे उघडे केल्यानंतर विरोधी पक्षात एकही नेता राहणार नाही, असे ते म्हणाले.

दिवसाला 30 ते 35 कोटींचा निधी मतदारसंघासाठी आला आहे. आतापर्यंत सुमारे 40 हजार कोटींचा निधी मिळाल्याचा दावाही खासदार निंबाळकर यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

SCROLL FOR NEXT