Pandharpur News, Pandharpur Muncipal Council, Devotess saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : पंढरपूरात 115 इमारती धोकादायक; पडक्या मठ, धर्मशाळांत भाविकांनी राहू नये : पालिकेचे आवाहन

सर्व धोकादायक इमारतींच्या मालकांना या इमारती उतरवून घेण्याच्या लेखी सूचना करण्यात आली आहे.

भारत नागणे

Pandharpur News : पंढरपूर शहरातील तब्बल 115 मठ आणि धर्मशाळा यांच्या इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या धोकादायक इमारतीमध्ये वारक-यांनी मुक्कामासाठी उतरू नये असे आवाहन पंढरपूर पालिकेने केले आहे. तसेच धाेकादायक इमारतींवर सावधनतेचे फलक लावले आहेत. (Maharashtra News)

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त लाखाे भाविक पंढरपूरला येत असतात. भाविकांची काेणतीही गैरसाेय हाेऊ नये यासाठी पंढरपूरात प्रशासन सज्ज झाले आहे. भाविकांसाठी एसटी महामंडळाने यंदा नवे बसस्थानक खूले करण्याचे नियाेजन केले आहे. भाविकांना विठ्ठलाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी पत्रा शेड उभारण्यात आले आहेत. पंढरपूरात सध्या माेठ्या संख्येने भाविक दाखल हाेऊ लागले आहेत.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील मठ, धर्मशाळा आणि राहत्या घरांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये 115 मठ, धर्मशाळा धोकादायक झाल्याची गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे.

या सर्व धोकादायक इमारतींच्या मालकांना संबंधित इमारती उतरवून घेण्याच्या लेखी सूचना पालिकेतून देण्यात आल्या आहेत. तसेच पालिकेने शहरातील अशा सर्व धोकादायक इमारतींवर सूचना फलक लावले आहेत. अति धोकादायक इमारती पालिका स्वत: पाडणार असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी सांगितले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT