Vitthal Rukmini Puja Saam tv
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Puja : विठ्ठल रुक्मिणी पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी; २५ मार्चपासून अशी करा नोंदणी

Pandharpur News : ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रात पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे

भारत नागणे

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करण्यासाठी अनेक भाविकांची इच्छा असते. अशा विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण हि पूजा करण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या दिवशी पूजेची संधी मिळणार असून याकरिता भाविकांना ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा सुरु करण्यात येत आहे. येत्या २५ मार्चपासून सदरची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येत आहे. यामुळे भाविकांसाठी हे सोयीचे ठरणार आहे. 

ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रात पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात होत आहे. या चंदनउटी पूजेची नोंदणी देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

चार महिन्यांसाठी होणार नोंदणी 
विठ्ठल मंदिर समितीने पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केली जात आहे. १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांसाठी ही नोंदणी होणार आहे. यामध्ये भाविकांना चंदन उटी पूजेची नोंदणी करता येणार आहे. मंदिर समितीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा ऑनलाईन पध्दतीने नोंदणी सुरू केली आहे.

यावर करता येणार नोंदणी 

१ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्यपूजा व चंदन उटी पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT