Mula River
Mula RiverSaam tv

Mula River : मुळा नदी फेसाळली; कंपनीचे रसायन मिश्रित पाणी नदीत सोडल्याने आरोग्य धोक्यात

Pimpri Chinchwad News : मुळा नदीपात्रामध्ये आजूबाजूच्या काही कंपन्यांनी प्रक्रिया न केलेले रसायन मिश्रित पाणी सोडले आहे. तसेच मैला मिश्रित पाणी सोडल्याने मुळा नदी पात्र मोठ्या प्रमाणात फेसाळले
Published on

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथून वाहणारी मुळा नदी रसायन मिश्रित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. नदीतून वाहत असलेल्या पाण्यावर पूर्णपणे पांढराशुभ्र फेस आलेला दिसत आहे. आजूबाजूच्या परिसरातील कंपन्यांमधील रसायन मिश्रित पाणी नदीत सोडल्याने नदीतील जीव तसेच मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथून प्रवाहित असलेल्या मुळा नदीपात्रामध्ये आजूबाजूच्या काही कंपन्यांनी प्रक्रिया न केलेले रसायन मिश्रित पाणी सोडले आहे. तसेच मैला मिश्रित पाणी सोडल्याने मुळा नदी पात्र मोठ्या प्रमाणात फेसाळले आहे. रसायन मिश्रित आणि मैला मिश्रित पाण्यामुळे विशाल नगर येथील मुळा नदीवरील चोंधे पाटील बंधारा देखील मोठ्या प्रमाणात फेसाळला आहे. अर्थात या सर्व प्रकारामुळे नदीतील पाणी दूषित झाले आहे. 

Mula River
Shindkheda Accident : परिवारासोबत होळीचा आनंद ठरला अखेरचा; सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाचा अपघातात मृत्यू

कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

नदी पात्र फेसाळल्यामुळे मुळा नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याने जलचर जीवन तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. नदीवरून अनेक ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो. त्यांचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. मुळा नदी पात्रात रसायन मिश्रित आणि मैला मिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते रविराज काळे यांनी केली आहे.

Mula River
Fruit Crop Insurance Scam : मराठवाड्यात फळबाग विमा घोटाळा; तब्बल १२ हजाराहून अधिक बोगस विमा अर्ज

नदी सुधार प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च 

दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका नदी सुधार योजनेच्या नावावर जवळपास ३५० कोटी रुपये खर्च करत आहे. नदी सुधार प्रकल्प करत असताना मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल देखील करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका करत असलेला नदी सुधार प्रकल्प हा नेमकं कशासाठी आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com