Fruit Crop Insurance Scam : मराठवाड्यात फळबाग विमा घोटाळा; तब्बल १२ हजाराहून अधिक बोगस विमा अर्ज

Sambhajinagar News : मागच्या वर्षी साम टीव्हीने मराठवाड्यातील बोगस पीक विमा घोटाळा उघडकीस आणला होता. आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत फळबाग विम्यातील घोटाळा समोर आला
Fruit Insurance Scam
Fruit Insurance ScamSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : सरकारने सुरु केलेल्या पीक विमा व फळपिक विमा योजनेत बोगस लाभार्थी दाखविले जात असल्याचा प्रकार समोर आले आहेत. यातच मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात फळबाग विम्यात घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यात लागवड झालेल्या क्षेत्राच्या तीनपट अधिकचे क्षेत्र दाखवून बोगस विमा उतरविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मागच्या वर्षी साम टीव्हीने मराठवाड्यातील पिक विमा योजनेतील बोगस पीक विमा घोटाळा उघडकीस आणला होता. आता त्याच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत फळबाग विम्यातील घोटाळा समोर आला आहे. यामध्ये अस्तित्वात नसलेल्या फळबागेचा विमा उतरविला आहे. काहींनी त्यांच्या शेतातील फळबागे पेक्षा दुप्पट, तीनपट क्षेत्राचा विमा उतरविला असल्याचे तपासणीत उघड झाले. त्यामुळे या तीन जिल्ह्यात भरलेले १२ हजार ३१५ बोगस फळबागधारकांचे विमा अर्ज अपात्र ठरविले आहेत.

Fruit Insurance Scam
Dahanu News : खेळताना पाण्याच्या टाकीवरून पडून दोन मुलींचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल

माजी कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ४ हजार बोगस अर्ज 

धक्कादायक म्हणजे माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ हजार ३३ अर्ज बोगस आहेत. तर माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील ३५७ शेतकऱ्यांनी फळबाग विम्यात बनवेगिरी केल्याचे उघड झाले आले. फळबाग शेतकऱ्यांनी भरलेल्या अर्जाची विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

Fruit Insurance Scam
Shindkheda Accident : परिवारासोबत होळीचा आनंद ठरला अखेरचा; सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाचा अपघातात मृत्यू

१२ हजार ३१५ बोगस अर्ज रद्द 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३ हजार २८६ शेतकऱ्यांनी तर जालना जिल्ह्यातील १८ हजार ९२२ फळबाग विम्याचे अर्ज कंपनीला मिळाले होते. बीड जिल्ह्यातील ३ हजार ४२३ शेतकऱ्यांचे विमा अर्ज होते. त्यातील १२ हजार ३१५ अर्ज बोगस असल्याचे आढळून आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे अस्तित्वात नसलेल्या फळबागेचा विमा उतरविल्याचे दिसून आले. तर काहींनी त्यांच्या शेतातील फळबागे पेक्षा दुप्पट, तीनपट क्षेत्राचा विमा उतरविला आहे. यामुळे सदरचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com