Pomegranate Exports Saam tv
महाराष्ट्र

Pomegranate Exports : डाळिंब निर्यातीला फटका; बांग्लादेशातील हिंसाचारामुळे शेकडो टन डाळिंब पडून

Padharpur News : बांगलादेशमध्ये मागील काही दिवसांपूर्वी हिंसाचार उफाळून आला आहे. यामुळे भारताने दोन्ही देशांची सीमा बंद केली आहे.

भारत नागणे

पंढरपूर : बांगलादेशामध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे अराजकता पसरली आहे. त्यांचा फटका प्रामुख्याने देशातून निर्यात होत असलेल्या शेती मालाला बसत आहे. बांग्लादेशमध्ये होणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे. यात महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

बांगलादेशमध्ये (Bangladesh) मागील काही दिवसांपूर्वी हिंसाचार उफाळून आला आहे. यामुळे भारताने दोन्ही देशांची सीमा बंद केली आहे. परिणामी देशातून बांगलादेशात निर्यात केला जाणार शेती मालावर देखील परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. प्रामुख्याने कांदा निर्यात बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. या पाठोपाठ (Pomegranate) डाळींबाची निर्यात देखील थांबली असून शेकडो टन डाळींब पडून आहे. 

५० टन मालाची गाडी कोलकात्यात अडकली 
सांगोला येथील डाळिंब उत्पादक (Farmer) शेतकरी शशिकांत येलपले यांचे २ ऑगस्टला बांग्लादेशात निर्यात केलेले ५० टन डाळिंब कोलकतामध्ये अडकून पडले आहे. तर दोनशे टन निर्यातक्षम डाळिंब सांगोल्यामध्ये पडून आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. केंद्र सरकारने या परिस्थितीतून मार्ग काढून मार्ग काढून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT