Pandharpur News
Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: विठ्ठल– रुक्मिणी मंदिरात भाविकांना सेवेची संधी; आषाढी यात्रेपासून सुरवात

साम टिव्ही ब्युरो

पंढरपूर : शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Vitthal Rukmini Temple) भाविकांना सेवा‌ देता येणार आहे. येत्या आषाढी यात्रेपासून (Aashadhi Wari) ही सेवा‌ सूरू करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांसाठी आता विठ्ठल रुक्मिणीची सेवा देण्याची संधीचा लाभ मिळणार आहे. (Breaking Marathi News)

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सेवा‌ करण्याची संधी मिळावी; अशी मागणी भाविकांनी केली‌ होती. भाविकांच्या मागणीचा विचार समितीने येत्या आषाढी यात्रेपासून भाविकांना सेवा‌ देता येणार आहे. या संदर्भात सविस्तर कृती आराखडा तयार करून त्यानुसार भाविकांना मंदिरांसह (Pandharpur) परिसरात मोफत सेवा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मंदिर समिती सांगेल त्यानुसार जे भाविक सेवा देण्यास तयार होतील; अशा भाविकांना ही वर्षभर सेवा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल; असे ही धोरण ठरविले जाईल अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली. ज्या भाविकांना मंदिरात सेवा देण्याची इच्छा आहे; अशा भाविकांनी मंदिर समितीकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन समितीने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

Vivo V30e 5G भारतात लॉन्च; 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये आहेत अनोखे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT