Pandharpur Man dies after loud Dolby sound Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Man dies after loud Dolby sound: पंढरपुरमध्ये डॉल्बीमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पंढरपुरच्या शिवाजी चौकात दहीहंडी कार्यक्रमात ही घटना घडली. त्यामुळे खळबळ उडाली.

Priya More

भरत नागणे, पंढरपूर

पंढरपुरमध्ये डॉल्बीने एकाचा बळी घेतला आहे. पंढरपूरच्या शिवाजी चौकात ही घटना घडली आहे. दहीहंडीनिमित्त डॉल्बी लावण्यात आला होता. या डॉल्बीचा आवाज सहन न झाल्यामुळे एक नागरिक चक्कर येऊन पडला. यामध्ये जखमी झालेल्या या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पंढरपुरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरच्या शिवाजी चौकात दहीहंडीनिमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉल्बी लावण्यात आला होता. हा कार्यक्रम पहायला आलेल्या एका नागरिकाला डॉल्बीचा आवाज सहन झाला नाही. डॉल्बीच्या जोरदार आवाजामुळे ही व्यक्ती चक्कर येऊन खाली पडली. जखमी झालेल्या या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉल्बीचा आवाज सहन न झाल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही व्यक्ती कोण आहे याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पंढरपूर पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करून घेतली आहे. त्या व्यक्तीची माहिती पोलिस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ठणठणाट; डिझेल तुटवड्यानं शेतकऱी मोठ्या संकटात

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT