Sant Dnyaneshwar Mauli Palkhi 2025: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान; कसा असणार मार्ग?

Dnyaneshwar Maharaj Pune Palkhi 2025 Schedule: आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखीचा मार्ग कसा असणा आहे ते जाणून घ्या.
Sant Dnyaneshwar Mauli Palkhi 2025
Sant Dnyaneshwar Mauli Palkhi 2025Saam Tv
Published On

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. आळंदी देवस्थान आणि प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी शेतीची प्राथमिक कामं पूर्ण केली असून, त्यामुळे यंदा वारकऱ्यांची संख्या दिडपट वाढणार असण्याची शक्यता आहे. लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. काल संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान झाली. त्यानंतर आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान करणार आहे. (Dnyaneshwar Maharaj Pune Palkhi 2025 Schedule)

Sant Dnyaneshwar Mauli Palkhi 2025
Ashadh Wari: पालखी सोहळ्यात ड्रोन वापरास बंदी; कारण काय? VIDEO

या भक्तीमय वारी सोहळ्याला ‘निर्मल वारी’ची सामाजिक जाणीव जोडली गेलीय. स्वच्छतेचा संदेश देत, प्रशासन आणि वारकऱ्यांनी एकत्रितपणे स्वच्छतेचा निर्धार घेतलाय. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तसेच आळंदी परिसरात शौचालयांची आणि पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करण्यात आली आहे.प्रशासनाकडून वारकऱ्यांना आवाहन करण्यात आलंय की, वारी पवित्रतेसोबतच स्वच्छही व्हावी यासाठी शौचालयांचा वापर करावा आणि निर्मल वारीच्या संकल्पनेला हातभार लावावा.

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग कसा असणार आहे?

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून म्हणजे आजच निघणार आहे. पालखीचा दोन दिवस पुण्यात मुक्काम असणार आहे. पुढे २४ तारखेला सासवडवरुन पालखी जेजुरीला जाणार आहे. २५ तारखेला वेल्हे, त्यानंतर २७ तारखेला लोणंदला पालखी पोहचणार आहे.

Sant Dnyaneshwar Mauli Palkhi 2025
Pandharpur Wari: विठुरायाच्या भेटीची ओढ! तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान; मार्ग कसा असणार? वाचा सविस्तर

१ जुलै रोजी पहिले गोल रिंगण पार पडणार आहे. त्यानंतर २ जुलैला दुसरे गोल रिंगण आणि ३ जुलै रोजी तिसरे गोल रिंगण पार पडणार आहे. यानंतर पालखी ५ जुलै रोजी पंढरपुरला दाखल होणार आहे. ६ जुलै रोजी आषाढी एकादशीला माऊलींच्या पालखींची नगर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर चंद्रभागा नदीत स्न्नान केले जाईल. १० जुलै रोजी माऊलींची पालखी पुन्हा परतीचा प्रवास सुरु करणार आहे. ही पालखी २१ जुलै रोजी पुन्हा आळंदी येथे पोहचणार आहे.

Sant Dnyaneshwar Mauli Palkhi 2025
Paithan- Pandharpur : संत एकनाथ महाराज पालखीचं आज संध्याकाळी पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान |VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com