Ashadh Wari: पालखी सोहळ्यात ड्रोन वापरास बंदी; कारण काय? VIDEO

Security First: संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात २० ते २३ जून या कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. पालखी सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक, वारकरी, दिंड्या आणि पर्यटक सहभागी होणार आहेत. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

सोहळ्यादरम्यान ड्रोनचा गैरवापर, अनधिकृत छायाचित्रण किंवा संवेदनशील भागात हवाई चित्रीकरणाच्या माध्यमातून गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत शहरात ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ पुणे शहर पोलिसांकडून अधिकृत हवाई पाळत ठेवण्यासाठी, तसेच पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) यांच्याकडून लेखी परवानगी प्राप्त झालेल्यांना या बंदीतून अपवाद ठेवण्यात आला आहे. अन्य कोणत्याही व्यक्ती, संस्था, आयोजक यांनी ड्रोन वापरायचा असल्यास पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असेल.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com