Pune : दररोज ₹५०० च्या परताव्याचं आमिष आणि थेट ३३ लाखांचा गंडा, पुण्यातील डॉक्टर-व्यापारी पती-पत्नीचा कारनामा

Pune investment fraud : पुण्यातील आळंदी परिसरात गुंतवणुकीवर दररोज ₹५०० परताव्याचे आमिष दाखवून ६ जणांची ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप. डॉक्टर-व्यापारी पती-पत्नीवर गुन्हा दाखल.
Pune Investment Fraud
Pune Investment Fraud
Published On

Pune couple cheats six investors of Rs 33 lakh : आर्थिक गुंतवणुकीवर दररोज आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ६ जणांची ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात उघडकीस आला आहे. लोकांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भागवत गंगाधर पऱ्हाड आणि धनश्री भागवत पऱ्हाड या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०२४ ते ऑगस्ट २०२६ दरम्यान धानोरे फाटा येथे हा सर्व प्रकार घडला असून, चऱ्होली खुर्द येथील रहिवासी राहुल भोलेनाथ भोसले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धनश्री पऱ्हाड हिचे धानोरे फाटा येथे 'चिरायू क्लिनिक' नावाचे दवाखाना असून पती भागवत याचे 'श्रीभा कलेक्शन' नावाचे कपड्यांचे दुकान होते. शेजारीच मोबाईल शॉपी असलेल्या राहुल भोसले यांच्याशी त्यांची ओळख झाली. एका ओळखीच्या सोनाराकडे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज ५०० रुपये परतावा मिळवून देण्याचे आमिष पऱ्हाड दांपत्याने दाखवले.

Pune Investment Fraud
SRA फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने लाटले ५.५७ कोटी; काँग्रेस खासदाराच्या पीएवर गुन्हा दाखल

सुरुवातीला काही दिवस परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी परतावा देणे बंद केले. जेव्हा तक्रारदारांनी आपली मूळ गुंतवणुकीची रक्कम परत मागितली, तेव्हा पऱ्हाड पती-पत्नीने टाळाटाळ करत "पैसे मागितल्यास विनयभंगाची खोटी केस टाकू," अशी धमकी दिली. अखेर फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांत धाव घेतली.

Pune Investment Fraud
Pune : इन्स्टाग्रामवरील 'सिया'च्या जाळ्यात अडकला पोलीस पाटील, शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५६ लाखांना गंडवले

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनश्री भागवत पऱ्हाड आणि भागवत गंगाधर पऱ्हाड यांनी गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून खालील व्यक्तींकडून एकूण ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपये गोळा केले:

राहुल भोसले व त्यांचे भाऊ गौरव भोसले: ₹१५,७४,४२५

यशवंत सुनील गावडे (बांधकाम व्यावसायिक, धानोरे): ₹१०,००,०००

शुभम बाळासाहेब लोखंडे व मोनिका बाळासाहेब लोखंडे (धानोरे): ₹६,००,०००

योगेश ज्ञानेश्वर वंजारी (चऱ्होली खुर्द): ₹१,७०,०००

आरोपींनी "१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज ५०० रुपये परतावा दिला जाईल; मात्र शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी परतावा मिळणार नाही," या अटीवर जादा परताव्याचे आमिष दाखवले होते. अशा प्रकारे लोकांचा विश्वास संपादन करून त्यांचा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com