पंढरपूर : भारतात पक्षाच्या चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. पक्षाची चोरी होवू नये, यासाठी श्री विठ्ठलाने निवडणूक (Pandharpur) आयोगाला योग्य अशी बुद्धी द्यावी. एका पक्षाची चोरी झाली दुसऱ्या पक्षाची चोरी होणार नाही. यासाठी आता विठ्ठलाची परीक्षा आहे; असे ही साकडे राष्टवादीचे जयंत पाटील (jayant Patil) यांनी श्री विठ्ठलाला घातले. (Maharashtra News)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे या संदर्भात निवडणूक आयोगा समोर आज सुनावणी होणार आहे. या विषयाच्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी आज पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विठ्ठल चरणी साकडे घातले.
निवडणूक आयोग आमची बाजू ऐकेल तेव्हा आमच्या कडील बहुसंख्य लोक शरद पवार यांना पाठिंबा देत आहेत. ही बाजू ऐकून घेतली जाईल. शिवसेना आणि आमची केस यात फरक आहे. २७ राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. बहुसंख्य पदाधिकारी सगळे शरद पवार यांच्या सोबत आहेत. आमची प्रतिज्ञा पत्र संख्या जास्त आहे. त्यांची कमी आहे. ५० हजार पेक्षा कमी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. चुकीचा निर्णय झाला तर न्यायालयात जावे लागेल. पण तसे होणार नाही असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
२०१९ प्रमाणेच यंदाही जागा लढवू
भाजपच बहुमत असताना दुसऱ्या कुणाचं ऐकून राष्ट्रपती राजवट लावू शकता हे कसं होईल. आफ्टर थॉट आलेलं आहे. लोकसभा निवडणूक मध्ये जेवढ्या जागा लढल्या तेवढ्याच यंदा लढू, जिथे शिवसेना खासदार निवडून आले, त्या ठिकाणी शिवसेना सोबत चर्चा करावी लागेल.
नांदेड प्रकरण झालं पण सगळी कडे औषध तुटवडा जाणवत आहे. एकत्र औषध खरेदी करण्याचा प्रकार झाल्याने अस घडत आहे. अधिकारांचे केंद्रीकरण झाल्याने हे घडत आहे. मंत्री हट्टापायी हे घडत आहे. सरकारचे अक्षम्य दुर्लक्षमुळे हे घडत आहे. आरोग्य सेवावर लक्ष नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.