शनिवारी खरा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. त्याआधीच आज अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड दोघेही सर्व आमदारांसह जून २०२२ मध्येच भाजपसोबत जाणार होते, असं पटेल म्हणालेत. त्यांच्या या दाव्याने राष्ट्रवादीचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. (Latest Marathi News)
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर सुरत गाठून गुवाहाटीला जाण्याचं ठरवलं त्याचवेळी ही घटना घडणार होती. अनिल देशमुख आणि नवाब मलिक त्यावेळी तुरुंगात होते. त्यामुळे त्यांना वगळता राष्ट्रवादीच्या इतर ५१ आमदारांसह जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची इच्छा व्यक्त करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना पत्र दिलं होतं, असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत.
शिंदेंचे बंड सुरू असताना जयंत पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. त्यांनी शरद पवारांना तेव्हा कॉल करून याबाबत कळवले होते. मात्र पवारांनी त्यांना रोखले. तसेच पुढचे दोन-तीन दिवस थांबा अन्यथा माध्यमांमध्ये चर्चा होईल, असं पवारांनी म्हटल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
"दोन-तीन दिवस थांबले असताना शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सर्वांना वाटत होतं. मात्र शिंदे मुख्यमंत्री झाल्याने सर्वांसाठी हे आश्चर्यकारक होते." राष्ट्रवादीतील मंत्री चौकशी एजन्सींच्या त्रासाला कंटाळून भाजपसोबत गेल्याचा आरोप पवारांसोबतच त्यांच्या गटातील मंत्री करतात. मात्र त्यांच्या या विधानात काही तथ्य नसल्याचं, प्रफुल्ल पटेल म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.