पंढरपूर : पंढरपूरचा आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. अशातच राज्यात निपा आणि झिका आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. राज्यातील काही शहरांमध्ये रुग्ण आढळून आल्याने पंढरपूरमध्ये प्रशासन अलर्ट झाले आहे. झिका आणि निपा आजाराच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात ३० बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी संशयित रुग्णांची लागलीच तपासणी केली जाणार आहे.
राज्यातील पुणे, कोल्हापूर, नगरसह अन्य भागामध्ये झिकाचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे चिंता वाढली असून (Zika Virus) झिकाचे आषाढी यात्रेवर सावट निर्माण झाले आहे. झिका बरोबरच निपा संसर्गजन्य आजाराचाही मोठ्या प्रमाणात फैलाव होऊ लागला आहे. हे दोन्ही आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने देखील आता कंबर कसली आहे. प्रामुख्याने झिका आणि निपाच्या पार्श्वभूमीवर (Pandharpur) पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात ३० बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये संशयित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाचे भाविकांना आवाहन
आषाढी यात्रेच्या (Ashadhi Wari) निमित्ताने पंढरपुरात १५ ते १६ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. झिका हा आजार संसर्गजन्य नसला तरी भाविकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी; असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान निपा हा संसर्गजन्य आजार असून हवेतून पसरतो. सर्दी, खोकला, ताप अशी प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळून आल्यास भाविकांनी व नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा; असे आवाहन पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सुडके यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.