Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : दुकानाची उधारी मागितल्याने गावात धुडगूस; हवेत गोळीबार करून दुकान, मोटारसायकलची तोडफोड

Pandharpur News : सुमारे ३० ते ४० गावगुंडांच्या जमावाने येथील बापू घाडगे यांना व त्यांच्या मुलास बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या किराणा दुकानची मोडतोड देखील केली आहे गावगुंडांनी मोटारसायकलींची तोडफोड

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरच्या अकलूज जवळच्या कोंडबावी गावात काही गावगुंडांनी हैदोस मांडल्याच्या पाहण्यास मिळाले. दुकानाची उधारी का मागितली या कारणावरून गावगुंडांनी दुकान चालकास बेदम मारहाण करत धुडगूस घातल्याची घटना घडली आहे. या टोळक्याने हवेत गोळीबार करून किरणा दुकानाची तसेच घरासमोर लावण्यात आलेल्या काही मोटारसायकलींची तोडफोड केली आहे.

अकलूज जवळच्या कोंडबावी गावात हा हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यात सुमारे ३० ते ४० गावगुंडांच्या जमावाने येथील बापू घाडगे यांना व त्यांच्या मुलास बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या किराणा दुकानची मोडतोड देखील केली आहे. तर या गावगुंडांनी काही मोटारसायकलींची तोडफोड करत गावात हैदोस घातला आहे. 

उधारीचे पैसे मागितल्याचा राग

बापू घाडगे यांचे गावात किराणा दुकान आहे. किराणा दुकानातून अनिल खरात यांनी उधारीने काही साहित्य नेले होते. त्याची उधारी का मागितली? असा जाब विचारत दुकान मालक बापू घाडगे यांना शिवीगाळ केली होती. यावेळी दोघांमध्ये वाद ही झाला होता. त्यानंतर काही गावगुंडांनी एकत्रित येत बापू घाडगे यांच्या दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला. यामध्ये सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती फिर्यादी बापू घाडगे यांनी दिली आहे. 

गावात तणावाचे वातावरण 

गावामध्ये अशा पद्धतीने ३० ते ४० जणांच्या टोळक्याने गुंडगिरी करत दहशत निर्माण केली. गोळीबार करत सुटल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सध्या गावात तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT