Jalgaon Heat Wave : जळगाव जिल्ह्यातही येलो अलर्ट; तापमान पोहचले ४३.५ अंशांवर

jalgaon News : जिल्ह्यात आगामी तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील तापमान ४२ अंशाच्या वर पोहचले
Jalgaon Heat Wave
Jalgaon Heat WaveSaam tv
Published On

जळगाव : राज्यात उष्णतेची लाट पसरली असून जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाच्या तडाखा वाढला आहे. सकाळपासूनच उन्हाचे असह्य चटके लागले असून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३.५ अंशांवर गेला आहे. दरम्यान जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून तापमान ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मराठवाडा, विदर्भसह उत्तर महाराष्ट्रातील शहरातील तापमान ४२ अंशाच्या पार गेले आहे. यात जळगाव जिल्ह्यात आगामी तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील तापमान ४२ अंशाच्या वर पोहचले असून आगामी काही दिवसात हे तापमान ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

Jalgaon Heat Wave
Nashik : नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुखासह सहा माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

अकोल्यातील तापमान ४४ पार 
अकोल्याच्या तापमानात वाढ सातत्याने वाढ होते आहे. दरम्यान मंगळवारी ४४.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे. मागील काही दिवसापासून अकोल्याचे तापमानात मोठी वाढ होत आहे. एप्रिल महिन्यातचं अकोल्याच्या तापमानाचा पारा ४४ अंशापार आहे. मागील पाच दिवसापासून अकोल्याचा तापमानाचा पारा सातत्याने ४४ अंशापार राहत आहे.

Jalgaon Heat Wave
Washim : अवैध दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार; पाण्याच्या टाकीवर चढून महिलांचे शोले स्टाईल आंदोलन

सावधानतेचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २५ एप्रिलला अतिउष्ण, दमट तापमान राहणार आहे. यात जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, परभणी, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर आदी जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ उष्ण लाट राहणार असून, जिल्हा प्रशासनाने सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com