Pandharpur Crime News Saamtv
महाराष्ट्र

Pandharpur Crime News: प्रेमविवाहाला विरोध केल्याने वडिलांना मुलीकडून बेदम मारहाण.. प्रियकराच्या मदतीने रचला डाव; तालुक्यात खळबळ

भारत नागणे

Solapur Crime News: प्रेम विवाहला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीसह तिच्या प्रियकराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरच्या माढा तालुक्यात घडली आहे. या मारहाणीत वडील गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना लेकीनेच प्रियकराच्या मदतीने बेदम मारहाण केल्याच्या घटनेने माढा तालुका हादरुन गेला आहे. साक्षी शहा असे मुलीचे नाव असून महेंद्र शाह असे तिच्या वडिलांचे नाव आहे. साक्षीच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध होता.

घटनेच्या दिवशी साक्षी कामानिमित्त पुण्याला गेली होती. पुण्यावरून परत येताना वडील तीला शेटफळ जवळ घ्यायला गेले होते. शेटफळ वरून घरी जात असताना साक्षीने लघुशंका करण्यासाठी वडाचीवाडी येथे गाडी थांबवली. त्यावेळी तिथे दबा धरून बसललेल्या तिच्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने महेंद्र शहा यांना मारहाण केली.

सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची साक्षीने पोलीस ठाण्यास फिर्याद दिली. मात्र साक्षीच्या जबाबातील विसंगती पाहून पोलिसांनी सखोल तपास करून 24 तासाच्या आत साक्षीसह पाच जणांना अटक केली आहे.

साक्षी शहा,चैतन्य कांबळे,आतिश लंकेश्वर,रामा पवार,बंडू उर्फ आनंद जाधव ,मयूर चंदनशिवे असे अटक केलेले आरोपींची नावे आहेत. या संतापजनक घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT