Narayan Rane Latest News: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधकांवर तुटून पडले. त्यांनी लोकसभेत ठाकरे गटाची लायकीच काढली.
"आमच्या पंतप्रधानांवर बोलण्याची कुणाला अधिकार नाही. तुमची औकात नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याची कुणाचीही औकात नाहीये", असे शब्द नारायण राणे यांनी वापरले.
नारायण राणे बोलत असताना, लोकसभेचे पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी त्यांना मध्येच थांबवलं. लोकसभेत बोलताना व्यक्तिगत टीका करू नका, असं म्हणत अग्रवाल यांनी नारायण राणेंना खाली बसायला सांगितलं.
यानंतरही नारायण राणे काही थांबले नाही. त्यांनी ठाकरे गटावर टीका करणं सुरूच ठेवलं. ठाकरे गटाला हिंदुत्वाचा अभिमान आहे, तर 2019 मध्ये तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही भाजपला धोका देऊन शरद पवार यांच्याकडे गेलात. मी 1967 पासूनचा शिवसैनिक आहे, असं नारायण राणे म्हणाले.
नारायण राणे यांचे हे शब्द ऐकताच विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे राणे अधिकच खवळले. अरे बस… मागे बस… असं राणे विरोधकांना म्हणाले. राणे यांच्या या भाषेवर लोकसभा अध्यक्षाने आक्षेप घेत त्यांना अध्यक्षांनी दोनदा राणेंना टोकलं आणि खाली बसायला सांगितलं.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारावरून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींचे मंत्री नारायण राणे लोकसभेत एखाद्या गल्लीतील गुंडांसारखी धमकी देत आहेत. मोदी सरकारला केवळ प्रश्न विचारला तरी खासदाराला सस्पेंड केलं जातं. त्यामुळे अभद्र भाषेचा प्रयोग केल्यामुळे भाजपच्या मंत्र्याला सस्पेंड केलं जाणार का? असा सवाल आपने केला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.